अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - अजित पवार

पंढरपूर - परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

अजित पवार रविवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली. तसेच त्यांनी यावेळी पंढरपूरमध्ये संरक्षक भिंत कोसळून मृत्यू झालेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट घेऊन, त्यांचे सात्वन केले. यावेळी आमदार भारत भालके, आमदार बबन शिंदे, आमदार संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची उपस्थिती होती.दरम्यान परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानाचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या घाटांचा व इतर कामांचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली राहील याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशा सुचना यावेळी पवार यांनी केल्या आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget