'एसटीएफ' च्या छापत्यात सापडली एक कोटी ६२ लाखांची रोकड

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्स, एसटीएफ) केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १ कोटी ६२ लाख रुपयांची रोख रक्कम, दागिने आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्क स्ट्रीट येथील एलियट रोड तसेच स्टरॅण्ड रोडवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.पार्क स्ट्रीट परिसरातील एलियट रोड येथील एका घरावर एसटीएफने छापा टाकला असता त्यांना पैशांनी भरलेली एक बँग आढळून आली. या बॅगमध्ये २००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. या बॅगमधील एकूण रक्कम ही अंदाजे एक कोटी ६२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रोख रक्कमेबरोबरच दागिणे, दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या घरातील सदस्यांना घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम किंवा दागिने का आहेत यासंदर्भात योग्य उत्तरे देता आली नसल्याने पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन माल जप्त केला आहे.

याचबरोबर एसटीएफने स्टरॅण्ड रोडवरील एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये देशी बनावटीच्या आठ पिस्तुल आढळून आल्या आहेत. यावेळी घरात असणाऱ्या दोन हत्यार विक्रेत्यांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या दोघांचीही पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget