सीबीआयला तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ला यापुढे राज्यात कोणतीही चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीनंतरच सीबीआयला चौकशी करण्याची मुभा मिळणार आहे. सीबीआयला कोणती चौकशी करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, यासाठीचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सीबीआयकडून भाजपाची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांमध्ये नको त्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून त्यासाठी त्याच्या राज्यातील सरकार यांची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच बिगर भाजपा राज्यातील सरकारांनी सीबीआयला लगाम घालण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मागील काही महिन्यांमध्ये सुशांत सिंग प्रकरणावरून सीबीआय आणि इतर यंत्रणांना मुळे राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परराज्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने आणि सुशांत सिंग प्रकरणावरून बरेच रान पेटवले होते. दुसरीकडे राज्यातील अनेक सहकार, उद्योग, अधिक क्षेत्रामध्येही काही प्रकरणात राज्य सरकारच्या चौकशा सुरू असतानाही सीबीआयने अनेक ठिकाणी हस्तक्षेप केल्याने याविषयीची प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे यापुढे सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. राज्य सरकारच्या गृह विभागाने काढलेला आदेश.केंद्र-राज्य संघर्षकेंद्राकडून अनेकदा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप सीबीआयवर होतो. अनेक राज्यांचे केंद्रासोबत खटके उडाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बिगर भाजपशासित राज्यांचा समावेश आहे. चिटफंड घोटाळ्याच्या तपासावरून सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये तणाव निर्माण निर्माण झाला होता. सीबीआयच्या राज्याअंतर्गत तपासाला लगाम लावण्यासाठी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालने याधीच निर्बंध घातले आहेत. आता त्याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील सीबीआयला चौकशीसाठी लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांनी उचललेल्या पावलानंतर सीबीआयला थेट चौकशी पासून रोखण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget