पुन्हा मोनो रेल आली मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई - रविवारपासून मुंबईची मोनो रेल पुन्हा एकदा या शहराच्या सेवेत रुजू झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बंद असणारी ही मोनो पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्यामुळे रेल्वेवरील ताण कमी होणार असल्याचे चित्र आहे. ही सेवा पुन्हा सुरु झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही सेवा पुन्हा एकदा सुरु झाली. चेंबूर ते जेकब सर्कल या अंतरात ही मोनो पुन्हा धावणार आहे. तर, वर्सोवा-अंधेरी - घाटकोपर मार्गावर चालणारी मेट्रो सेवा सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आता मुंबईतील सार्वजनिक वाहतून पुन्हा वेग पकडत असल्याचे चित्र आहे. 

२२ मार्चला देशव्यापी टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेचच या सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर आता थेट ऑक्टोबर महिन्यात त्या प्रवाशांच्यासेवेत रुजू होत आहेत. मोनो रेल सुरु झाली असली, तरीही यामध्ये प्रवास करण्यासाठी कोरोनासाठी आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असणार आहे. विनामास्क कोणत्याही प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. शिवाय सुरक्षित फिजिकल डिस्टंस राखण्यासोबतच इतरही सुरक्षेचे निकष पाळण्यासाठी प्रवाशांनी मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन सदर सेवेतर्फे करण्यात आले आहे. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget