रॅली दरम्यान तेजस्वी यादवांवर फेकली चप्पल

औरंगाबाद (बिहार) - बिहार विधानसभेच्या पार्श्वभुमीवर राज्यामध्ये सर्व पक्षांच्या सलग सभा सुरु आहेत. सर्व पक्षांचे स्टार प्रचारक बिहारला पोहोचू लागले आहेत. दरम्यान तेजस्वी यादव यांची  औरंगाबादमध्ये रॅली होती. रॅली दरम्यान गर्दीत उपस्थितांपैकी एका व्यक्तीने तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकली. दुसऱ्यांदा फेकलेली चप्पल तेजस्वी यांच्या हाताला लागली.चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु झाला. या घटनेवर आरजेडीच्या कोणत्याच नेत्याने विधान केले नाही.बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला ७१ विधानसभा जागांसाठी होईल. यासाठी सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. 

तेजस्वी यादव हे महाआघाडी सरकारमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री होते. सध्या ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे पूत्र आहेत. त्यांचा अनुभव तसा कमी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली. नितीश कुमारांच्या नेतृत्वात ते सरकारमध्ये आले. पण नंतर जेडीयूने आरजेडीसोबत नाते तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी एक-दोन नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी तब्बल सहा उमेदवार मैदानात असून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कोणाला मिळणार याबाबत उत्सूकता कायम आहे.  

जेडीयू, भाजपा, हम आणि व्हीआयपी युतीने पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे, तर महाआघाडीत आरजेडी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत आहेत. तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहे.


.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget