उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीची विटांनी ठेचून हत्या

लखनऊ - उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटना देशात गाजत असतानाच भदोही जिल्ह्यात एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. विटांनी डोके ठेचून मुलीची हत्या करण्यात आली आहे. बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

उत्तरप्रदेश पोलीसगोपीगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली.गुरुवारी दुपारी बाजरीच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. विटांनी डोके ठेचून तिची हत्या करण्यात आली. पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सिंह यांनी मुलीचा बलात्कार झाल्याची शक्यताही वर्तविली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत काहीही स्पष्ट सांगण्यास नकार दिला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.मुलगी दुपारी शौचास घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. बऱ्याच वेळानंतरही घरी माघारी न आल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतरच घराजवळ शेतात मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाण दिसून आले होते. बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ज्युवेनाईल कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget