पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची नाही - अमित शहा

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी पश्चिम बंगाल सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी बंगालच्या परिस्थितीविषयी विधान केले आहे. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात विरोधी पक्षाचे नेते मारले जात आहेत आणि लोकशाहीची हत्या केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप नेत्यांची मागणी चुकीची नाहीए, असे अमित शहा म्हणाले.

अमित शहा यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळ आले. पण तिथे कोणतीही चांगली व्यवस्था केली गेली नव्हती. बजेट घोटाळ्यांमध्ये गेला. केंद्र सरकारकडून जे धान्य पाठवले गेले त्यातही घोटाळे झाले. करोनासाठी ज्या प्रकारची व्यवस्था केली गेली पाहिजे होती तीदेखील झाली नाही, असा आरोप अमित शहांनी केला.

राज्यात कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. बॉम्ब बनवण्याचे कारखाने प्रत्येक जिल्ह्यात आहेत. सर्वात चिंता म्हणजे लोकशाहीत विरोधी पक्षनेत्यांची हत्या केली जात आहे. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात असे घडत नाही. यापूर्वी अशा घटना केरळमधून समोर यायच्या. पण आता तिथेही तसे घडत नाही. यावेळी पश्चिम बंगालमध्ये बदल होईल आणि भाजपचे सरकार येईल, असा दावाही अमित शहा यांनी केला. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget