तुरुंगात पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलेवर बलात्कार

भोपाळ - पोलीस कर्मचा-यांनी तुरुंगात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. खुनाचा आरोप असलेल्या २० वर्षीय महिलेने पाच पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातल्या मंगावन शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मे महिन्यात पोलिसांनी १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, विधी अधिकारी आणि दोन वकिलांनी १० ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तुरुंगात असलेल्या पीडित महिलेने तिची व्यथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना सांगितली. त्यानंतर या प्रकरणी न्यायाधीशांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. रेवाचे पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य करताना वेगळाच दावा केला. ९ मे ते २१ मे दरम्यान अत्याचार झाल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. मात्र आम्ही तिला आणि तिच्या मैत्रिणीला २१ मे रोजी अटक केली. खुनाच्या आरोपाखाली मंगावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघींना ताब्यात घेण्यात आले,’ असे सिंह यांनी सांगितले.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी १० ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विधी पथकातले वकील सतीश मिश्रांनी पीडित महिलेकडे इतके महिने गप्प का राहिलीस, याबद्दल विचारणा केली. त्यावर तीन महिन्यांपूर्वी आपली आपबिती वॉर्डनच्या कानावर घातली होती. अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी तुरुंगातच असल्याने याबद्दल भीती वाटत होती, असे पीडितेने सांगितल्याची माहिती मिश्रांनी दिली.

तुरुंगात घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास तुज्या वडिलांनी खून प्रकरणात गोवण्यात येईल, अशी धमकी पोलिसांनी दिली होती. पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार ३ महिन्यांपूर्वी आपल्याला सांगितला होता, याची माहिती वॉर्डनने दिली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तिचा जबाब नोंदवला. तो जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवण्यात आला. यानंतर या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget