खान्देशात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढणार

जळगाव - खान्देशात ज्यांनी भाजप रुजवला आणि वाढवला असे एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. खडसेंच्या या पक्षबदलाने कसे बदलेल खान्देशातले राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. खान्देशात आता भाजपला उतरती कळा लागेल आणि राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील, अशीच चर्चा आहे.   

खान्देशातले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे नवे कोरे तडाखेबाज नेतृत्व असणार आहे. खडसेंच्या नेतृत्वात धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात राष्ट्रवादी आता पाळंमुळे आणखी घट्ट करेल. त्यातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले अनिल गोटे आणि खडसे यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येत भाजपविरोधात राळ उठवतील, अशीच चर्चा आहे. 

जळगाव महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र अनेक नगरसेवक खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सत्तांतर होऊ शकते. ग्रामीण भागात सावदा, यावल, भुसावळ नगरपालिकांमध्येही सत्ताबदल होऊ शकतो.

 दूध फेडरेशन, बाजारसमित्या आणि जिल्हा बँकांमध्ये राष्ट्रवादीची पकड घट्ट होऊ शकते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक जागा कमी आहे, त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. लेवा पाटील समाजाचं मोठे पाठबळ राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे.  Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget