अर्णब यांची चौकशी समन्स बजावून करा ; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

मुंबई - ‘एआरजी मीडिया’ या कंपनीचे प्रमुख व ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना ‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी आरोपी करण्यात आल्यास त्यांना अन्य आरोपींप्रमाणे समन्स बजावून चौकशीसाठी बोलवावे, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले.अर्णब हे या प्रकरणी अद्याप व्यक्तिश: आरोपी नाहीत, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आल्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. तसेच ‘एफआयआर’ म्हणजे काही विश्वकोष नाही. त्यामुळे तपासाची कागदपत्रे आणि आतापर्यंत काय तपास केला हे आम्हाला पाहायचे आहे, असे स्पष्ट करत प्रकरणाच्या तपासाचा प्रगती अहवाल पुढील सुनावणीच्या वेळी मोहोरबंद पाकिटात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.

अर्णब यांच्यासह त्यांच्या ‘एआरजी मीडिया’ कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेत ‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावरील सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अर्णब यांची बाजू मांडताना त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केली. पालघर झुंडबळी प्रकरणाच्या वृत्तांकनानंतर राज्य सरकार आणि पोलिसांकडून अर्णब यांना लक्ष्य केले जात असून त्यांच्या अटकेची शक्यता साळवे यांनी व्यक्त केली. तर पालघर प्रकरणाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तसेच अर्णब हे या प्रकरणी अद्याप व्यक्तिश: आरोपी नाहीत. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना समन्स बजावून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एकालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले. सिब्बल यांच्या वक्तव्याची नोंद न्यायालयाने घेतली. तसेच अर्णब यांना अद्याप आरोपीच केलेले नसल्याने त्यांना अटकेपासून दिलासा देण्याचा वा पोलिसांना त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget