रिया चक्रवर्तीचे शिवसेना कनेक्शन ; सुशांतसिंह राजपूतच्या मित्राचा खुलासा

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतसिंहचा जवळचा मित्र सुनील शुक्ला  याने गंभीर आरोप केला आहे. रिया चक्रवर्ती हिचे शिवसेना पक्षाशी कनेक्शन आहे. या कनेक्शनची चौकशी करण्याची त्याने मागणी केली आहे.

सुनील शुक्ला याच्या आरोपानुसार रिया चक्रवर्ती हिला महाराष्ट्रातील लोणावळ्यातील पवना तलावाजवळ जमीन खरेदी करायची होती. राज्याच्या वन विभागाची ही जमीन खरेदी करण्यासाठी रिया हिने कथितपणे वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेत चर्चा केली होती. परंतु लॉकडाऊन असल्याने याबाबतचा व्यवहार झाला नाही.

सुनील शुक्ला याने सीबीआयला याची चौकशी करुन सत्य समोर आणण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या आरोपांमध्ये सत्य असल्यास, आगामी काळात रियाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.विशेष म्हणजे पवना भागात सुशांतसिंह राजपूत याने 'हँग-आऊट व्हिला' नावाचे फार्म हाऊस भाड्याने घेतले आणि तिथे सुट्टीला जायचा. नुकतीच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सुशांतच्या काही नोट्स आणि इतर वस्तू या फॉर्म हाऊसमधून जप्त केल्या आहेत. इतकेच नाही तर या फॉर्म हाऊसचे केअर टेकर आणि येथील बोटमन यांनी एनसीबीला दिलेल्या निवेदनात सांगितले की, सुशांतने रिया चक्रवर्ती, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत या फार्म हाऊसवर वेगवेगळ्या वेळी पाटर्या केल्या आहेत.

या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील कोण कोण होते, ते ड्रग्जचे सेवन करत होते की नाही याची चौकशी एनसीबी (NCB) करत आहे. यासंदर्भात एनसीबीने आतापर्यंत दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीने आतापर्यंत कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. आतापर्यंत चौकशीत बॉलिवूडमधील काही बड्या कलाकारांची नावेही समोर आली आहेत. या सर्वांना एनसीबी लवकरच चौकशीसाठी बोलवू शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget