आजपासून राजस्थानमधील रुग्णवाहिका कर्मचारी संपावर

जयपूर - कोरोना काळात रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे रुग्णवाहिका. मात्र, राजस्थानमधील रुग्णांना आता रुग्णालयात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. कारण, आजपासून राज्यातील सर्व रुग्णवाहिका कर्मचारी संपावर जाणार आहेत. सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत रुग्णवाहिका कर्मचारी संघटनांनी हा बंद पुकारला आहे.

राजस्थान रुग्णवाहिका कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका कर्मचारी वारंवार सरकारकडे आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र, त्यांच्या एकाही मागणीवर सरकार विचार करत नसल्याचा आरोप शेखावत यांनी केला आहे.उच्च न्यायालयाने २०१९च्या डिसेंबरमध्ये रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे वेतन २० टक्क्यांनी वाढवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला नाही. तसेच, गेल्या १२ वर्षांपासून रुग्णवाहिका कंपन्या कर्मचाऱ्यांचे शोषण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कोरोना काळातही अविरतपणे सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना कंपन्या मास्क आणि सॅनिटायझरही पुरवत नाहीत. तसेच, खराब स्थितीमध्ये असलेल्या रुग्णवाहिका चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांना भाग पाडण्यात येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत राज्यात १०८ आणि १०४ क्रमांकांच्या रुग्णवाहिका संपावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget