खडसेंकडून राष्ट्रवादी प्रवेशाचे सूचक संकेत?

मुंबई  - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे  ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. 

नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केले. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केले होते. त्यांनी म्हटले होते की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असे वाटले  होते. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.

विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला.

दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होतं की, “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणे, पुन्हा सामान्य होणे ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणे सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील”.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget