खडसेंचा भाजपाला रामराम ; राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब



मुंबई -
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकला असून, राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तीन दशके भाजपमध्ये काम करून भाजपला बळ दिले. त्यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असे मला सांगितले. शुक्रवारी २ वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.एकनाथ खडसेंच्या येण्याचे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. भाजपमध्ये होणारा अन्याय अनेक लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत. असे देखील जयंत पाटील म्हणाले.खडसेंना काय द्यायचे याची चर्चा झालेली नाही, शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पक्षात येत असल्याचे देखील जयंत पाटील म्हणाले. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget