छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची तूलना केली 'रावणाशी'

रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारबद्दल बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची तूलना रावणाशी केली आहे. हे सरकार आत्मकेंद्री असून हे केवळ नवरात्रीतच दिसून येते आहे. मात्र समाजरुपी दुर्गा याचा नक्कीच निषेध करेल असे ते म्हणाले.

डॉ. रमण सिंग यांनी कॉंग्रेस सरकारला पुन्हा एकदा विविध मुद्दयांवरुन घेरले आहे. कशाप्रकारे सरकार अपयशी ठरले हे गावोगावी सांगण्यासाठी आम्ही धोरणे ठरवू, कोणताही विभाग या सरकारपासून समाधानी नाही. केंद्र सरकरच्या विविध योजनांबद्दल चर्चा केली जाईल असे विधान राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप नेत्याने केले आहे. तसेच शेतकरी असो किंवा तरुण वर्ग, कोणीही समाधानी नाही, त्यांच्या समस्यांवरही चर्चा केली जाईल असेही ते म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget