November 2020


गेल्या नऊ महिन्यांपासून असलेला लॉकडाऊन हळूहळू पूर्ववत होत असताना पुन्हा कोरोना सक्रिय झाल्याचे आढळून आल्याने राज्याची दास्ती वाढली त्यामुळे पुन्हा लॉक होणार या भीतीने नागरिक चिंतेत पडले आहेत.देशात नऊ महिने लॉकडाऊन झाल्याने नागरिकांचे हाल झाले होते हे आपण सर्वानीच पहिले आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. जणू संपूर्ण जग थांबले होते. लॉकडाउनच्या अगोदरच्या काळात लोकांनी मज्जा घेतली कारण देशच नव्हे तर संपूर्ण जग स्तब्ध झाले होते. त्यामुळे कोणतेच व्यवहार होत नव्हते.मुख्य म्हणजे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळाले. त्याचे कारण गाड्यांना ब्रेक लागला होता त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घाट झाली. हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले होते. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वच कमला ब्रेक लागला होता. त्यामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. कित्येक लोकांचा यामध्ये जीव गेला असावा. विचार करायचा म्हंटले तर अंगावर शहरे आणणारा हा काळ होता. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची अवस्था फारच बिकट झाली होती. रोज काम केले तर त्यांचे घर चालते अशांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला . तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केले तेव्हा हे सर्व जण आदेश पाळत आले आहेत. कोरोना विषाणू वाढू नयेत हा विचार सर्वसामान्य लोकांनी केला. मात्र काम नाही तर घर कसे चालवायचे हा प्रश्न देखील त्यांच्या समोर उभा होता. त्यातूनही सामान्य जनतेने कसेबसे दिवस काढले.आता हळूहळू कोरोना जात असतानाच कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तविण्यात आली. म्हणून आता महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोना पुन्हा एकदा थैमान घालणार का ? पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असे प्रश्न सध्या सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत.याच पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नकोअसे म्हणत आपला विरोध दर्शवला.खरेतर,सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, गेल्या काही दिवसांपासून बिनधास्तपणे वावरण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसत आहे. ही स्थिती करोना वाढीस कारणीभूत ठरणारी असून त्यासाठीच निर्बंध लावले जाणार आहेत. लॉकडाऊन लावला जाणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात. दिवाळीच्या सणात खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणीही गर्दी होत आहे. विनाकारण आणि विनामास्क फिरणारे वाढले आहेत, या सर्वाचाच विचार करून निर्बंध घातले जाऊ शकतात.त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये घालून दिलेले नियम पाळण्याची गरज आहे.

 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दीड वर्षापूर्वी कोसळला होता. त्यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. लोखंडी पूल गंजण्याची शक्यता असल्याने याठिकाणी स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाचे घेतला आहे. हा पूल बांधण्यासाठी पालिका ७ कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या निविदा पुढच्या आठवड्यात काढल्या जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. १४ मार्च,२०१९ रोजी सायंकाळी  हिमालय पूल कोसळला होता. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटने आधीच अंधेरी रेल्वे स्थानकावरील वाहतुकीचा गोखले पुलाचा काही भाग कोसळून २ जणांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही दुर्घटनांमुळे पालिकेने मुंबईमधील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. या ऑडिटमध्ये ब्रिटिशकालीन अनेक पूल धोकादायक असल्याचे समोर आले. धोकादायक पुलांपैकी काही पूल पालिकेने पाडले. त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पुलावरील वजन वाढल्याने हिमालय कोसळला असे निरीक्षण नोंदवल्यात आल्याने हा पूल लोखंडी न बांधता स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाचे घेतला आहे.स्टेनलेस स्टीलच्या पुलामुळे भविष्यात पुलाला गंज पकडण्याचा धोका टळणार आहे. पूल बांधण्याबाबत पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच काम सुरू करण्यात येणार असून पुढील सहा महिन्यांत पूल पादचाऱ्यांना वापरासाठी खुला करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पूल विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र कुमार तळकर यांनी दिली.

बरेली - जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करवून लग्न करण्यावर म्हणजेच 'लव्ह जिहाद'वर बंदी घालण्यासाठी नुकताच अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत पहिली एफआयआर उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली आहे. बरेली येथील देवरानिया पोलीस ठाण्यात ही फिर्याद दाखल करण्यात आली.देवरिया पोलीस परिमंडळांतर्गत येणाऱ्या शरीफ नगर गावात राहणाऱ्या टीकाराम यांनी तक्रार दिली आहे की, त्यांच्या गावातील एक तरुण आपल्या मुलीला फूस लावून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत आहे. या संशयिताविरोधात धर्म परिवर्तनाचे कलम ५०४/५०६ आणि ३/५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जात असून तपास चालू आहे, असे राज्याच्या गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे

नवी दिल्ली - मागील चार दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे.शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. दिल्लीत येणारे पाचही रस्ते आम्ही बंद करू असा इशारा आंदोलकांनी दिला. तसेच आपल्या पाच मागण्या सरकारपुढे मांडल्या.

तीन केंद्रीय कृषी कायदे शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिणे असून त्यांना तत्काळ रद्द करावे,किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि माल खरेदीची किंमती हमी द्यावी,वीज अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा, शेतातील पिकांचे भूसकट जाळण्यावरली दंड रद्द करावा. अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यास सरकारने परवानगी नाकारली आहे. बुरारी येथील मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. मात्र, जंतरमंतरवरच आंदोलन करण्यावरून शेतकरी ठाम आहेत. हरयाणा आणि दिल्लीमधील सिंघू आणि टिकरी येथील सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले असून त्यांनी तेथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. पंजाब, हरयाणा हिमाचल प्रदेश आणि इतरही अनेक राज्यातून शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र, पोलीस आता त्यांना दिल्लीत प्रवेश देत नाही.

विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या चिंतापल्ली उपविभागात ५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक विद्यासागर यांनी दिली आहे. या महिन्यात आतापर्यंत १३ जणांनी आत्मसमर्पण केले असल्याचे त्यांनी सांगितले.रविवारी चिंतापल्ली उपविभागात ५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.सरकारकडून देण्यात येत असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमांमुळे माओवादी शरण येत आहेत. विशाखापट्टणम जिल्हा पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे ते आकर्षित झाले असून, त्यांनी शरण यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत विशाखापट्टणम विभागातील एकूण २५ सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली - पूर्व लडाखच्या सीमेवर चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर आता भारतीय नौदलाचे मार्कोस (मार्कोस) कमांडो फोर्स पँगोंग लेकजवळ तैनात करण्यात आले आहे. चीनशी संघर्षानंतर भारतीय वायुसेनेची गरुड व भारतीय सैन्याच्या पॅरा स्पेशल फोर्सेसचे कमांडो आधीच येथे तैनात आहेत. आता नौदलाचे मरीन कमांडोही तैनात करण्यात आले आहेत.पँगोंग लेकमध्ये मार्कोस कमांडोच्या तैनातीमुळे चीनवरील दबाव वाढेल. मरीन कमांडो तैनात झाल्याने भारतीय वायुसेना, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढेल. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, मरीन कमांडोजच्या तैनात करण्याचे उद्दीष्ट म्हणजे तीन सेवांचे एकीकरण वाढविणे आणि अति थंडीची परिस्थिती उद्भवल्यास नौदल कमांडो त्याला सामोरे जातील. मिळालेल्या माहितीनुसार, मार्कोस यांना पँगोंग लेक भागात तैनात केले गेले आहे. यावर्षी एप्रिल-मेपासून भारतीय आणि चिनी सैन्यात सतत संघर्ष सुरु आहे.या नौदल कमांडोना नवीन बोटी देखील मिळतील ज्यामुळे त्यांना पांगोंग सरोवरात कोणत्याही प्रकारच्या कामकाजासाठी सुलभता येईल.

भारतीय लष्कराच्या विशेष सैन्याने पूर्व लडाखमध्ये विशेष कार्यवाही करण्यासाठी बरेच दिवस काम सुरू केले आहे. सीमेवरील वाद मिटविण्यासाठी अनेकदा कमांडर लेवलवर भारत आणि चीन यांच्यात चर्चा झाली. पण चीन माघार घेण्यास तयार नाही. माघार जरी घेतली तरी चीनवर लगेच विश्वास ठेवात येणार नाही.याआधी भारतीय वायुसेनेच्या गरुड स्पेशल फोर्सेसला नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले आहे. एलएसीच्या या उंच भागावर शत्रू देशांची विमाने भारतीय हवाई जागेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून येथे हवाई दलाचे गरुड विशेष दल तैनात केले आहे.अत्यंत कठीण प्रशिक्षणानंतर मार्कोस कमांडो तयार होतात. असे म्हटले जाते की जेव्हा एक हजार सैनिक अर्ज सादर करतात तेव्हा त्यातील एक मार्कोस कमांडो बनतो. मार्कोस कमांडोची क्षमता कल्पनाशक्तीच्या पलीकडे असते. मार्कोसचे कमांडो कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असतात.

नाशिक  - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न २ डिसेंबरपर्यंत मार्गी लावा अन्यथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. येत्या २ डिसेंबरपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास शरद पवारांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच सर्व पक्षीय आमदारांना चोळीबांगड्या भेट देण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोचार्ने दिला आहे. त्यामुळे येत्या २ तारखेनंतर राज्यात मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुण्यात होते. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात ५४ टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिले पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. कधी नव्हता. मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळालेच पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे भुजबळांनी स्पष्ट केले.


पुणे - येथिल बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. परकीय चलनासंदर्भातल्या फेमा कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात आली. अविनाश भोसलेंच्या ईडी चौकशीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. पण माध्यमांना त्यांची माहिती मिळाली.अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी झाल्याने राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.अविनाश भोसले यांची मुंबईतील ईडी कार्यालयात पाच तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आल्याचे  सांगितले जात आहे.चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानुसारच भोसले मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचल्याचे सांगण्यात आले. विदेशी चलन प्रकरणात फेमा (FEMA) कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. यापूर्वीही अनेक कारणांनी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात भोसले यांचा दबदबा राहिला आहे. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई - सध्या आणीबाणीसदृश परिस्थिती असून राज्याच्या इतिहासात एवढे धमक्या देणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, अशी परखड टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आमच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कितीही तक्रारी केल्या, तरी या नाकर्त्यां सरकारला वठणीवर आणण्यासाठी व जनतेसाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.सर्वोच्च व उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेले निकाल हेच राज्य सरकारच्या कामाचे प्रगतीपुस्तक आहे. सत्तेचा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना धमकावणे सुरू आहे. मुख्यमंत्री पद स्वीकारताना ‘मी कोणावरही आकसाने किंवा द्वेषाने कारवाई करणार नाही,अशी देण्यात आलेली शपथ आणि संविधानाचेही विस्मरण उद्धव ठाकरे यांना झाले आहे.

पहिल्या वर्षपूर्तीनंतर सरकारने या काळात केलेले काम, भविष्यातील नियोजन, दिशा, याविषयी बोलणे अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये हे काहीच नव्हते, केवळ धमकावणीची भाषा होती. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकार आता कोणाला जबाबदार धरणार आहे व कोणती कारवाई करणार आहे,असा सवाल फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्रीपदासाठी न दिलेले वचन यांच्या लक्षात राहते, पण शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार रुपये मदतीचे दिलेले वचन का लक्षात राहत नाही,असा सवाल फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणात मोठा घोळ केला असून सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकीलही हजर राहत नाहीत. विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

 

मुंबई - 'सरकार तीन पक्षांचे आहे. त्यात नाराजी आहे, पण तरीही ते टिकेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती', असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सामना रोखठोक' मध्ये मत मांडले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने 'सामना'त लिहिलेल्या लेखात संजय राऊत यांनी सरकार स्थापनेच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर, विरोधकांकडून घेतले जाणारे आक्षेप व केल्या जाणाऱ्या भाकितांचाही त्यांनी समाचार घेतला. 'महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे,' असे राऊत यांनी म्हटले आहे.अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे 'एनडीए' सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे? असा सवालही राऊतांनी यावेळी केला आहे. 

'सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल. 

मुंबई -  अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने अमली पदार्थांच्या बाबतीत मोठी कारवाई केली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बैगणवाडी परिसरातून २०५३ कोडिन फॉस्फेट या नशेसाठी विकल्या जात असलेल्या औषधांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही औषध कुठल्याही उपचारासाठी वापरात नव्हती, तर परिसरात असलेल्या अल्पवयीन व्यसनी मुलांना विकण्यासाठी या औषधांचा साठा करण्यात आला होता. मानवी शरीरास घातक असलेल्या कोडिन फॉस्फेट हे औषध राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छुप्या मार्गाने याची तिप्पट किमतीत विक्री केली जात आहे. गोवंडीत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात याची विक्री सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळाली होती.बैगनवाडी परिसरात एका घरात त्यांना हा कोडिन फॉस्फेटचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून, त्याची किंमत ४ लाख ११ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल श्रावण गायकवाड (२६) या आरोपीला अटक केली आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकताच अभिनेता संजय दत्तसोबत एक फोटो ट्विट करुन त्याला शुभेच्छा दिल्याचा एक सुंदर संदेश शेअर केला आहे. कंगनाने ट्वीटमध्ये लिहिले आहे - संजय दत्त ज्या हैदराबादच्या हॉटेलमध्ये राहत होते, त्याच हॉटेलमध्ये मी थांबल्याचे मला समजताच, सकाळी संजू सरांना भेटायला गेले. त्यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली. मी त्यांना पूर्वीपेक्षा अधिक देखणे आणि निरोगी पाहिले, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी नेहमीच तुम्हाला आरोग्यासाठी शुभेच्छा देते. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते यावरही बरीच प्रतिक्रिया देत आहेत.

कंगना रणौत सध्या तिच्या आगामी थलायवीचित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलसाठी हैदराबादमध्ये आहे. या दरम्यान तिने हॉटेलमध्ये अभिनेता संजय दत्तची भेट घेतली.विशेष म्हणजे, संजय दत्तला लँग कॅन्सर आहे आणि खुद्द संजय दत्तने ही माहिती आपल्या ट्विटद्वारे चाहत्यांशी शेअर केली होती. संजयने ११ ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते, ज्यात त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की आपण वैद्यकीय उपचारासाठी थोडा ब्रेक घेत आहोत. यानंतर २१ ऑक्टोबर रोजी संजयने कर्करोगाविरूद्धची लढाई जिंकल्याचे सांगितले. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ला २०२१ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून पाठवण्यात आले आहे. 'आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' या प्रकारात भारताचा अधिकृत प्रवेश म्हणून जल्लीकट्टू चित्रपटाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली.हा चित्रपट हिंदी, मराठी, ओडीया आणि इतर प्रादेशिक भाषांतील २७ चित्रटांतून निवडला गेला. या चित्रपटात डोंगराळ, दुर्गम भागातील एका खेडेगावातील कत्तलखान्यातून सुटलेला रेडा आणि त्याची शिकार करण्यासाठी पूर्ण गावातील एकत्र आलेले लोक अशी या चित्रपटाची कथा आहे.हा चित्रपट 'माओइस्ट' या पुस्तकातील कथेवर आधारित आहे. लेखक हरिश यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या चित्रपटात अँटोनी वर्गसे, चेंबन विनोद जोसे, साबुमोन अब्दुसमद आणि संथी बालाचंद्रन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.माणूस हा खरंतर प्राण्यांपेक्षाही क्रूर कसा आहे, हे या चित्रपटातून दिसून येतं, असे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे ज्यूरी बोर्डचे अध्यक्ष राहुल रावैल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच पेलीस्सेरी हा सक्षम दिग्दर्शक असून त्यांने बनवलेला जल्लीकट्टू हा चित्रपट देशाला अभिमान वाटेल अशी उत्कृष्ट निर्मिती आहे, असेही ते म्हणाले. दिग्दर्शक पेलीस्सेरी हे 'अंगमाली डायरी' आणि 'ई मा याऊ' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात.टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी जल्लीकट्टूचा प्रिमिअर शो करण्यात आला होता. तसेच, गेल्या वर्षी ५०व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पेलिस्सेरीने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला होता.

मुंबई - वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने काल राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. मनसेच्या आंदोलनाला मुंबई, पुणे, ठाणे येथे परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढत महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. आंदोलनादरम्यान मुंबई, ठाणे, पुणेसह अनेक ठिकाणी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.कोरोनाकाळातील महिन्यामध्ये वाढलेले अवाजवी वीजबिलांमध्ये माफी द्यावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. मुंबईत बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणी वीजबिल भरू नका आणि जर वीजबिल मागायला कोण आले तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. महावितरणकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यात आंदोलन केले जाणार होते. पुण्यातील शनिवारवाडापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही शेकडो कार्यकर्त्यांची शनिवारवाडा परिसरात एकत्र येऊन मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू होती. मात्र, यावेळी मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोन तास चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही सोडून देण्यात आले. 

मुंबई - मुंबईमध्ये पुन्हा करोना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊ नये. अनुयायांनी आपल्या घरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन पालिका, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पाश्र्वभूमीवर विविध संघटनांची एक बैठक पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पालिका, पोलीस खात्यांच्या अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. किरण दिघावकर यांनी बैठकीत या कामांचा आढावा घेतला. करोना संसर्ग लक्षात घेऊन अनुयायांनी चैत्यभूमीवर न येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केले.


नवी दिल्ली  - बिहार निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुका पडल्या. अध्यक्ष पदाच्या निवडणुकामध्ये महागठबंधनच्या नेत्याचा विजय व्हावा, यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी एका एनडीच्या आमदाराला फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एनडीएने केला आहे. संबधित आमदाराने लालू प्रसाद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सरकार पाडण्याच्या कटात आपल्या सामील करण्याचा प्रयत्न लालू यांनी केला. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून माझा पक्ष आणि सरकार माझ्यासोबत आहे, असे पीरपैती येथील भाजपाचे आमदार ललन पासवान यांनी म्हटले.

माझ्यासारख्या नवख्या आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या आमदाराला लालू प्रसाद यादव यांनी आमिष दाखवले. हे फारच चिंताजनक आहे. त्यांनी मला सरकार पाडण्याच्या कटात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून मी निगरानी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे आमदार ललन पासवान म्हणाले. ललन पासवान यांनी ऑडियो क्लीपमधील संभाषणाची लिखित स्क्रिप्ट तक्रारीसोबत ठाण्यात जमा केली आहे.सुशील मोदी यांनी बुधवारी टि्वट करत लालू आणि भाजपा आमदार ललन पासवान यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप टि्वटवरून जारी केली होती. त्यामध्ये लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदाराला मंत्रीपदाचे आमिष देत असून कोरोनाचे कारण देत अनुपस्थित राहण्यासाठी सांगत आहेत, असा दावा एनडीएने केला आहे. तसेच मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनींही लालूंवर पक्ष फोडण्याचा आरोप केला आहे. लहान पक्षांना ते नेहमीच फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची फार जुनी सवय आहे, असे जीतन राम मांझी म्हणाले.बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान पार पडले. महागठबंधनच्या बाजूने अवध बिहारी चौधरी तर एनडीएच्या बाजूने माजी मंत्री आणि लखीसराय येथील आमदार विजय सिन्हा मैदानात होते. विजय सिन्हा यांचा विजय झाला असून त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. विजय सिन्हा यांच्या बाजूने १२६ आणि विरोधामध्ये ११४ मते पडली.

अहमदाबाद - राजकोट येथील शिवानंद कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात रात्री आग लागली. या आगीत पाच कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी  झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवानंद कोविड सेंटरमध्ये आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच राजकोट अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.याआगीत जखमी झालेल्या सर्व रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या अशाच एका घटनेत खासगी रुग्णालयात आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता.

श्रीनगर - काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले. प्रशिक्षण झाल्यानंतर गेल्या सात महिन्यापूर्वीच त्यांची पहिलीच पोस्टींग श्रीनगरला झाली होती. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली.दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ला करुन पळ काढला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील जवान यश दिगंबर शहीद झाले. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते.

दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यश देशमुख हे पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रीनगर येथे रूजू झाले होते. त्या बेशुद्ध झाल्या. यश यांचे वडील शेतकरी असून, लहान भावाचे बारावीचे शिक्षण झाले आहे. यश हे अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळावू होते. २८ तारखेला त्यांचे पार्थिव पिंपळगाव येथे आणले जाणार असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली - स्पुटनिक ५ लस करोनावर ९५ टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचा दावा रशियाने मंगळवारी केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या लशीच्या एका मात्रेचा दर १० डॉलरहून कमी (जवळपास ७४० रुपये) असेल, असेही रशियाने म्हटले आहे.या लशीची पहिली मात्रा दिल्यानंतर ४२ दिवसांनी ती लस टोचून घेणाऱ्यांबाबतची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. त्यावरून ही लस ९५ टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे सूचित होत आहे, असे गमेल्या राष्ट्रीय केंद्र आणि रशिया थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे. स्पुटनिक ५ ही दुहेरी मात्रा असलेली लस आहे.ऑक्टोबर महिन्यात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि आरडीआयएफला भारतात स्पुटनिक व्ही लशीची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्याची परवानगी भारताच्या औषध महानियंत्रकांनी दिली.२४ नोव्हेंबपर्यंत रशियातील २९ वैद्यकीय केंद्रांमध्ये २२ हजारांहून अधिक जणांना पहिली मात्रा देण्यात आली आणि १९ हजारांहून अधिक जणांना पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात आली.

मुंबई    साकिनाका येथील आनंद भुवन चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच घरातील ६ जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

साकिनाका येथील आनंद भुवन, जरीमरी, जगतापवाडी येथील एका चाळीत मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असतानाच या आगीत एकाच घरातील ६ जण भाजून जखमी झाले. या जखमींना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींना तपासले असता रुग्णालयात आणण्यापूर्वीच अलमास या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीता यांनी दिल्याचे पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. पहाटे साडे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभरापासून अहमद पटेल यांची कोरोनाशी झुंज सूरू होती. मात्र त्यांच्याकडून उपचारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्षाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ट्विट करून अहमद पटेलांना श्रद्धांजली वाहिली.

रायपूर - छत्तीसगडच्या कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एसएसबीचा एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी याबाबत माहिती दिली. रावघाट पोलीस ठाण्याच्या परिसरातील कोसरोंडामध्ये ही चकमक झाली. यामध्ये जखमी झालेल्या एसएसबी जवानाच्या पायाला गोळी लागल्याचे समजत आहे.या चकमकीनंतर परिसरातून काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकला सुरक्षा देणाऱ्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. तसेच, कोसरोंडा येथील एसएसबीच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता.मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगड मधील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्राकडून सात अतिरिक्त सीआरपीएफ पथकांची मागणी केली होती. यावर आता केंद्राकडून पाच सीआरपीएफ पथकांची परवानगी देण्यात आली आहे. बस्तर भागामध्ये या पाचपैकी चार पथकांची तैनाती करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.

आसाम - आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.तरुण गोगोई हे २५ ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोनावर मात केल्यानंतर २ नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना जीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोगोई यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करत नसल्याने त्यांना श्वसनाला त्रास होत होता. तरुण गोगोई हे २००१ ते २०१६ पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तरुण कुमार गोगोई यांनी आपल्या कार्यकाळात राज्यात बंडखोरी रोखण्यात यश मिळवले. आसाममधील ८५ लाखाहून अधिक लोकांना आपल्या कार्यकाळात रोजगार मिळाल्याचा दावाही त्यांनी केला होता. तरुण गोगोई यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३६ रोजी आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील टी-इस्टेट येथे झाला. गोगोई यांच्या वडिलांचे नाव कमलेश्वर गोगोई होते. तरुण गोगोई यांनी जोरहाट येथील शासकीय शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि जे.बी. महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर, गोगोई यांनी गौहाटी विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. ते विद्यार्थी नेते होते. गोगाई यांनी जोरहाट कॉलेज असोसिएशनचे सहसचिव म्हणून काम पाहिले. तसेच विद्यार्थी संघटनेचे जनरल देखील होते. तरुण गोगोई यांची १९९१ मध्ये कालीबोरमधून लोकसभेवर निवडूण गेले. १९९९ ते २०००या काळात रेल्वे विभागात लोकसभा समितीचे सदस्य होते. गोगोई यांनी सप्टेंबर२००१ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. यानंतर ते विधानसभेचे नेते म्हणून निवडले गेले. त्यानंतर ते आसामचे मुख्यमंत्री झाले. २००६ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०११ मध्ये झालेल्या निवडणुका जिंकल्यानंतर त्यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

मुंबई - संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे गेल्यानंतर राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ७ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन डिसेंबरऐवजी जानेवारीपर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. पुढील आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय झाला होता. पण आता कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशन होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा ही जनतेमध्ये सुरु झाली आहे.


मुंबई - करोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही. आता पाश्चात्य देशांसह दिल्ली, अहमदाबाद आदी विविध ठिकाणी करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून, करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रविवारी दिला. मात्र, तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील करोना रुग्णसंख्येत दिवाळीनंतर झालेली वाढ या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री आठ वाजता समाजमाध्यमांवरील थेट प्रक्षेपणामार्फत राज्यातील जनतेशी संवाद साधला. गेले आठ महिने जनतेने सहकार्य केले. नियमांचे पालन केले. सर्व धर्मीयांनी सणही साधेपणाने साजरे केले.त्याबद्धल ठाकरे यांनी जनतेचे कौतुक केले.

मात्र, दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी गर्दी झाली, याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी अनेक लोक मुखपट्टी न वापरता फिरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.  प्रामुख्याने तरुण मंडळी खबरदारी न घेता बाहेर फिरत असून त्यांना बाधा होत आहे. त्यांच्यामुळे घरातील वयोवृद्धांना करोनाची लागण होऊ शकते. करोना नियंत्रणापासून आता पुन्हा लाटेची शक्यता आहे. या धोकादायक वळणावर असताना हालचालींवर नियंत्रण हवे,असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या आठ महिन्यांपासून सतत काम करत असून त्यांच्यावरील ताण वाढू नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.अनेक जण हे उघडा ते उघडा, अशा मागण्या करत असतात. हे केवळ राजकारण आहे. पण त्यातून करोना वाढला तर ही मंडळी जबाबदारी घेणार का? असा सवाल करत त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. राज्यातील जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. त्या दृष्टीने जे करायचे ते सर्व महाविकास आघाडी सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

अद्याप लस आलेली नाही. डिसेंबर, जानेवारी किंवा त्यानंतर कधीतरी येईल, असे सांगितले जात आहे. पण, त्या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. राज्यातील साडेबारा कोटी लोकसंख्येचा विचार करता एकूण २५ कोटी डोस लागतील. त्यासाठी किती कालावधी लागेल याचाही विचार करून करोनाची लागणच होणार नाही याची काळजी घ्या. करोनानंतर काही रुग्णांना श्वसनसंस्था, पोट, किडनीचे त्रास होत आहेत. ते टाळायचे तर करोना टाळा. त्यासाठी गर्दीत जाणे टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. 

नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने करोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसेच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील.पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील.

दिल्ली तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी राहत असताना काही राज्यांमध्ये पुन्हा करोनाचे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत व तिचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे.निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत अलीकडेच झालेल्या बैठकीत, या लसींच्या किमतीसह आगाऊ खरेदीबाबतच्या बांधिलकीच्या मुद्दय़ावरही चर्चा करण्यात आली.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीनंतर ११ राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला विजय प्राप्त झाला आहे. या यशानंतर भाजपाने २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १२० दिवसांचा मास्टर प्लान केला आहे.१२० दिवसांमध्ये नड्डा संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. यामध्ये भाजपा नेत्यांच्या बैठका ते घेणार असून लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाचा पराभव झाला त्या जागांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत.

भाजपाचा हा दौरा अत्यंत नियोजनबद्ध राहणार आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी नड्डा स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. २०१९ लोकसभा निवडणुकामध्ये गमावलेल्या जागांवर तसेच भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर त्यांचा फोकस राहाणार आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकांमध्ये या जागा कशा काबिज करता येतील, यावर भाजपाची रणनीती असणार आहे. राज्यातील जिल्हाप्रमुख, संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट -नड्डा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर जाणार असून उत्तराखंड हे दौऱ्यातील पहिले राज्य असेल. भाजपा अध्यक्ष प्रत्येक राज्याचा दौरा करतील, सर्व बूथ युनिटच्या प्रमुखांशी, पक्षामधील सर्वात लहान संघटनात्मक संघटनांसोबत बैठका करतील. प्रत्येक राज्यातील जिल्हाप्रमुख, संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील, असे भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्ली - दिल्लीत खासदारांसाठी नवीन निवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांसाठी नव्याने बांधलेल्या घरांचे उद्घाटन करणार आहेत. ही घरे दिल्लीच्या बीडी मार्गावर बांधण्यात आली आहेत.खासदारांची ही नवी निवासस्थाने गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन टॉवरांमध्ये विभागली आहेत. खासदारांसाठी ७६ नवी निवासस्थाने २७ महिन्यांमध्ये १८८ कोटी रुपये खर्चून बांधली गेली आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदी यांचे उद्घाटन करतील, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.२६ नोव्हेंबर देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून देशातील संसद व राज्य विधानसभांच्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद केवडिया गुजरातमध्ये २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. संविधान दिनानिमित्त या परिषदेचे सर्व प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय राज्यघटनेत दिलेली प्रस्तावना वाचतील. २६ नोव्हेंबर २०२० रोजी होत असलेल्या समापन कार्यक्रमात एक ठराव संमत केला जाईल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

मुंबई - संपूर्ण जगात दहशत पसरविणारा देश, पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. शनिवारी पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले ज्यामध्ये एका भारतीय जवान शहीद झाला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अचानक गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये सैन्य हवालदार संग्राम शिवाजीन पाटील शहीद झाले.निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना राजोरी इथे वीर मरण आले. भारतीय सैन्यात संग्राम पाटील हे हवालदार पदावर कार्यरत होते. एका आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आले आहे.


मुंबई -  प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अखेर अटक केली आहे. भारतीचा पती हर्ष लिम्बाचिया याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हर्षची कसून चौकशी सुरू आहे.धक्कादायक म्हणजे एनसीबी च्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष याने ड्रग्स घेतल्याचे कबूल केले आहे. भारतीला एनडीपीएस अधिनियम १९८६ नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून एनसीबीने शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी८६.५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर ड्रग्स प्रकरणात एनसीबीने छापेमारी केली. या छापेमारीतून नार्कोटिक्स कंंट्रोल ब्युरोने काही प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त केले आहेत,  अशी माहिती समीर वानखेडे (आयआरएस झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई) यांनी दिली आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने ही छापेमारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीच्या ठिकाणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीला या दाम्पत्याच्या ड्रग सेवनाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.टेलिव्हिजनच्या माध्यमातून भारती सिंह हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. अशावेळी तिच्या घरावर ड्रग प्रकरणात झालेली छापेमारी तिच्या चाहत्यांसाठी आणि टेलिव्हिजन विश्वासाठी खळबळजनक आहे.


मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रायडेंट होटेल, कुलाब्यातील ताज पॅलेस हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा रुग्णालय, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा या ठिकाणी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत शेकडो जणांचा जीव घेतला होता तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले तर ३०० हुन अधिक जण जखमी झाले होते.अजमल कसाबसह आलेल्या ९ दहशतवाद्यांचा सामना मुंबई पोलिसांच्या जाबाज अधिकाऱ्यांनी मोठ्या हिमतीने केला होता. यामध्ये अजमल कसाबला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या तुकाराम ओंबळे, तत्कालीन एटीएस आयुक्त हेमंत करकरे, अ‌तिरिक्त आयुक्त अशोक कामटे, 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' विजय साळसकर, पोलीस निरीक्षक शशांक शिंदे, एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, एनएसजी कमांडो हवालदार गजेंद्र सिंग बिस्ट यांच्यासह तब्बल 18 जवानांना या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आले.

मुंबई शहराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १८ जाबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस विभाग व मुंबईकरांकडून आदरांजली वाहण्यात येते. या अगोदर गेली ११ वर्षे मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या शहीद स्मारकावर पोलीस मानवंदना देण्यात येत होती. मात्र, या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे याठिकाणी शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मानवंदना देता येणार नसल्यामुळे मुंबई पोलीस मुख्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस मुख्यालयाच्या इमारतीसमोर नवीन शहीद स्मारक बांधले जात आहे.युद्ध पातळीवर या शहीद स्मारकाचे काम सुरू असून या शहीद स्मारकावर १८ खांब उभे करण्यात आलेले आहेत. या १८ खांबांच्या मधोमध शहीद झालेल्या १८ जवानांची नावे शिलालेखावर कोरण्यात येणार आहेत. 

मुंबई - महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 'एकला चलो रे'ची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरली तर काँग्रेस सर्व २२७ जागांवर लढेल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेईल. हायकमांडने आदेश दिले तर २२७ जागांची काँग्रेसची तयारी असल्याचे ते म्हणाले. निवडणुकांसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीशी अजून चर्चा झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीचे एकत्र जमले नाही तर काँग्रेस एकटी लढेल, असे गायकवाड म्हणाले. मात्र याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर काँग्रेस कसेही लढली तरी पराभव नक्की आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी मारला आहे. 

दरम्यान,  ज्यांनी (भाजप) मुंबई महानगरपालिकेत आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल त्यांनी भाजपला केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली. त्याला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांच्या संदर्भात 'ड्रग्ज सिंडिकेट तपास करत असलेल्या एनसीबीकडून पुन्हा एकदा मुंबईतील अंधेरी, वर्सोवा याठिकाणी अमली पदार्थांच्या संदर्भात छापेमारी करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये बॉलिवूडशी संबंधित काही व्यक्ती व टीव्ही कलाकारांचाही समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील अंधेरी लोखंडवाला येथील घरावरसुद्धा छापा मारण्यात आला आहे. या छापेमारीमध्ये कुठल्या प्रकारचे अमली पदार्थ किंवा इतर गोष्टी आढळून आलेल्या आहेत का? याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही.यापूर्वी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याघरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) छापा टाकत, ड्रग्ज जप्त केले होते. तसेच बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते.अभिनेत्री दीपिका पादुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबीने चौकशी केली होती. एनसीबीने यापूर्वी सप्टेंबरमध्ये करिश्मा प्रकाश हिचा जवाब नोंदवला होता. दीपिका व्यतिरिक्त एनसीबीने सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीत ड्रग संबंधित प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खानवरही प्रश्न केला आहे. एनसीबीने तिन्ही अभिनेत्रींचे फोनही जप्त केले आणि त्यांना फॉरेन्सिक विभागात तपासासाठी पाठविले होते. 

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या नावावरुन किंवा त्यांच्या अधिकारावरुन वाद निर्माण होत असतात. असाच वाद पुन्हा एकदा सुरु झाला असून प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचे नाव कॉपी केल्याचा आरोप केला आहे.मधुर भांडारकर सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे आहे. मात्र, याच काळात करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजची घोषणा केली. मात्र, या सीरिजच्या नावावरुन मधुर यांनी संताप व्यक्त केला आहे. याच नावाशी संबंधित मी माझा चित्रपट करत असून करण आणि अपूर्व यांनी हेच नाव त्यांच्या सीरिजला देणे चुकीचे आहे असे मधुर यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे ( आय़एमपीपीए) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

करण जोहर आणि अपूर्व मेहताने मला या सीरिजचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे ठेवले तर चालेल का? असे विचारले होते. त्यावेळी मीदेखील याच नावाने चित्रपट करत आहे, त्यामुळे हे नाव ठेऊ नका असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचे नाव ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ असे ठेवले. हे अत्यंत चुकीचे आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचे नुकसान करु नका. माझी नम्र विनंती आहे तुम्ही या सीरिजचे  नाव बदला”, असे ट्विट मधुर यांनी केले आहे. 

दरम्यान, ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजचा पहिला सीजन २७ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये सीमा खान, महिप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तर मधुर भांडारकर यांनी ‘बॉलिवूड वाइव्ज’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे नाव सेन्सॉर बोर्डामध्ये रजिस्टर देखील केले आहे. या चित्रपटात शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर हा आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने मिशन मुंबईची घोषणा केली आहे. काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार सुरू केला आहे. त्याचवेळी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिेले आहे. एकेकाळी मित्रपक्ष असलेला भाजपा शिवसेनेचा विरोधक बनला आहे. भाजपाने मिशन मुंबईची घोषणा करताच शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगला येथे बैठक घेतली. या बैठकीत पालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. विरोधक काय बोलतात त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिकेत पंचवीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाने या काळात मित्रपक्षाची भूमिका पार पाडली. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता येताच भाजपाने मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवण्याचा निर्धार केला. मात्र, २०१७ मध्ये पुन्हा पालिकेत शिवसेनेचा महापौर बनला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे भाजपाने राज्यात आणि मुंबई महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खोणी गावच्या हद्दीतील एका बंद केमिकल कारखान्याला शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आग लागली होती. या कारखान्यातील साठवलेले केमिकलचे ड्रम्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने स्फोट झाले आणि आगीने रौद्ररुप धारण केले. ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले.परंतु,आगीतकारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

आग वीझविण्यासाठी सुरुवातीला भिवंडी अग्निशमन दलाच्या २ गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविणायचे प्रयत्न सुरू होते. मात्र, घटनास्थळ दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी गाड्या घेऊन पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच ठाणे, कल्याण डोंबिवली येथूनही अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. तर दुसरीकडे केमीकलमुळे आग अधिकच भडकत होती. या केमिकलच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फोमचा वापर जवानांना करावा लागला. या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे भिवंडी अग्निमशन दलाच्या कार्यलयातुन सांगण्यात आले. तर या आगीच्या घटनेची नोंद भिवंडी तालुक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ही भीषण आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पंढरपूर (सोलापूर) - कार्तिकी वारीनिमित्ताने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये २४ नोव्हेंबर ते ते २६ नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी असणार आहे. आषाढी वारी कालावधीत ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदी केली होती, त्याचप्रमाणे कार्तिकी वारीलाही जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर आणि पंढरपूर शहर स्तरावर नाकाबंदी असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. 

पंढरपूरकडे येणाऱ्या आणि पंढरपूरवरून जाणाऱ्या एसटी बससेवाही २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या तरी बससेवा सुरूच रहाणार असल्याचे सांगितले. मात्र वाढती गर्दी लक्षात घेता संबधित विभागाने बस सेवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्या तसा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कालावधीत बस सेवा सुरू रहाणार की नाही या बाबत संभ्रम आहे.पंढरपूरमध्ये सुरक्षिततेसाठी सुमारे १८०० पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे.वारी कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचेही अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.यंदा कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून पंढरपूर येथे दिंड्या दाखल होऊ देऊ नयेत, असे आदेश विधी व न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी कोणतीही दिंडी पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत.श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये सहा फूटांचे अंतर ठवायचे झाल्यास दर्शन रांग २५ किलोमीटरहून अधिक लांब जाईल. यामुळे पोलीस, आरोग्य आणि अन्य यंत्रणेवर ताण येईल. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी शासनाकडे यंदाची वारी प्रतिकात्मक असावी, असा प्रस्ताव पाठवला होता. त्याची दखल शासनाने घेतली आहे.

मुंबई - कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न देशातील राज्यांत तीव्र झाले आहेत. अहमदाबादनंतर सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्येही रात्री कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार दिल्ली-मुंबई विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार करीत आहे.कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता हरियाणामधील सर्व शाळा आणि महाविद्यालये ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांना शाळेत जाण्यासही मनाई असेल. तसेच मुंबई महापालिकेनेही ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.राजधानी दिल्लीत कोरोना अनियंत्रित झाला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या ९० लाखांवर गेली आहे.इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने काही देशांना पुन्हा लॉक़डाऊनची घोषणा करावी लागली. कोरोनावर अजूनही तरी कोणतेही औषध नसल्याने लॉकडाऊन हाच एकमेव मार्ग विविध देशांच्या सरकारपुढे आहे.

मुंबई - मुंबई महापालिका ही मराठी अभिमान, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या दुश्मनांचे हात मुंबईच्या गळय़ापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला.बाळा नातू व चिंतू पटवर्धन या पेशव्यांनी लाल महालावरील भगवा खाली खेचून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. भगवा खाली उतरविताना त्या मंडळींच्या चेहऱयावर एक प्रकारचा आसुरी आनंद दिसत होता. भगवा उतरताना पाहून समस्त पुणेकर, देश दुःखाने खाली मान घालून चरफडत होते, पण काही मंडळी अत्यानंदाने बेहोश झाली. त्या बेहोश मंडळींच्या वारसदारांना मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे.विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला. भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील व त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न. शिवरायांचे सातारा व कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत, पण भगव्याची मालकी मराठी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे.असे अग्रलेखात म्हंटले आहे. 

डेहराडून - बद्रीनाथ धामाचे दरवाजे काल ३ वाजून ३५ मिनिटांनी बंद करण्यात आले आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. दरवाजे बंद झाल्यानंतर प्रशासकीय परवानगीशिवाय हनुमान चट्टीच्या पुढे जाण्याची परवानगी नसते.बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे १५ मेला उघडण्यात आले होते. आद्य शंकराचार्य यांनी ९ व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.बद्रीनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने पाकव्यापत काश्मीरमध्ये 'पिनपॉईंट स्ट्राईक' केला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला झाला, अशी काही वृत्तसंस्थांनी माहिती दिली होती. मात्र, त्यामध्ये तत्थ नसल्याचे आणि असा कोणताही हवाई हल्ला झाला नसल्याचे भारतीय लष्कराकडून आता स्पष्ट करण्यात आले आहे.भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झालेला नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला झाल्याचे वृत्तही खोटे असल्याचे भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी पीटीआयच्या हवाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. या वृत्ताला काहीही अर्थ नसून ते वृत्त खोटे आहे, असेही परमजित सिंग यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सेना वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांना सीमेपलीकडून घुसखोरी करण्यासही पाकिस्तान लष्कर मदत करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बऱ्याच वेळा एकीकडे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत मिळावी म्हणून दुसरीकडे पाकिस्तान लष्कर आर्टिलरी गन्सच्या सहाय्याने अंदाधुंद गोळीबार करते. यात बऱ्याच सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.एकीकडे दहशतवादाला समर्थन देणारा पाकिस्तान, एफएटीएफच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली राखण्यासाठी आता सीमेवरील तरुण नागरिकांना लक्ष्य करत आहे. या तरुणांच्या सहाय्याने ते भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये ठार झालेले दहशतवादी हे सामान्य नागरिक असल्याचे सांगत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरुन सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न करत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र येत आहेत. विरोधी पक्षांचा असा आरोप आहे की, गैर-भाजप उमेदवारांना सुरक्षित राहण्याची सुविधा व प्रचाराच्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे.डीडीसी निवडणुकीत सहभागी असलेला गट म्हणतो की, त्यांच्या उमेदवारांवर सुरक्षेच्या नावाखाली अनेक निर्बंध लादले जात आहेत. दहशतवाद्यांकडून संरक्षणाच्या नावाखाली प्रशासन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून प्रचारासाठी सुविधा देत नाही. तर निवडणूक प्रचारासाठी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एस्कॉर्टची सुविधा पुरविली जात आहे.नॅशनल कॉन्फरन्सचे प्रांत अध्यक्ष नासिर अस्लम वानी म्हणाले की, "ते आमच्या उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सुविधा पुरवत नाहीत. ते त्यांना हॉटेल किंवा निवासस्थानांमध्ये ठेवत आहेत. त्यानंतर काही तास वाट पाहिल्यानंतर ते त्यांना सुरक्षित कारमध्ये एकत्र घेऊन प्रचारासाठी त्यांच्या भागात घेऊन जात आहेत. तर भाजप व त्याशी संबंधित पक्षांना स्वतंत्र सुरक्षा मिळाली आहे.

पीडीपी नेते खुर्शीद आलम म्हणाले की, ही तक्रार खरी नाही. डीडीसी निवडणुकीसाठी कोणतेही अपक्ष किंवा गटाचे आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करीत आहेत. सुरक्षेच्या नावाखाली पोलीस त्यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात आणि अनावश्यक असल्यास बाहेर पडण्यास नकार देतात.

आयजी विजय कुमार म्हणाले की, 'प्रत्येक उमेदवाराला सुरक्षा पुरविणे फार अवघड आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षित घरांमध्ये ठेवले जात आहे. यानंतर पोलीस सुरक्षेत सर्वांना एकत्र प्रचारासाठी त्यांच्या भागात नेले जात आहे. ते म्हणाले की एखाद्या विशिष्ट पक्षाला प्राधान्य देण्याच्या आरोपामध्ये कोणतेही सत्य नाही.'


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या दादरमधील वसंतस्मृती येथील कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचे उद्घाटनही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केले.कित्येक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. देशाच्या सर्वाधिक कोरोना केसेस मुंबईत आणि महाराष्ट्रात का?मुंबईतील मृत्यू दर कोरोनामूळे वाढला होता. महाराष्ट्रासारखी भीषण अवस्था दुसऱ्या राज्यात पाहिली नाही. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. कोरोनामुळे नुकसान झालेल्यांना पॅकेज जाहीर केले नाही.

सवलत देऊ, हजार कोटी देऊ, असे म्हणाले होते. मग ते कुठे आहे? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. केंद्र सरकारने ९००० कोटी देऊ केलेले ते घेतले नाही. एक पैशाची मदत देखील केली नाही नुसत्या बदल्या करण्यात हे सरकार व्यस्त होते. एंजटसारखेच काम करत होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी सरकारवर केली. महाविकास आघाडीसरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. जो गरिबांकरता काम करतो त्यांच्या पाठी लोक उभी राहतात. मागच्या पाच वर्षात अनेक अडकलेली काम मार्गी लावली आहे. कोस्टल रोड तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. रो रो सेवा सुरू केली. बीडीडी चाळ प्रकल्प सुरू केला. सरकार एलअँडएनटी कंपनीला मदत करायला तयार नाही. धारावीचा प्रश्न आम्ही सोडवला. मेट्रोच मोठे नेटवर्क उभे केले. मात्र हे सरकार विश्वासघातकी असल्याची टीका फडणवीसांनी केली.

बेकायदेशीर पोलीस कारवाई करणाऱ्यानी लक्षात ठेवा की सरकार बदलत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेली कारवाई देखील सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली आहे. भारतीय जनता पक्ष दोन हात करायला तयार आहे. राक्षचाचा जीव पोपटामध्ये तसा काहींचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकला आहे. मात्र आता महानगरपालिकेची सत्ता बदलणार आहे. मागच्या वेळीच मुंबई महानगरपालिकेत सत्ता बदलली असती, पण आम्ही दोस्ती निभावली. सत्तेचा माज यांच्या डोक्यात गेला आहे. मुंबई महानगरपालिकेची भाजपची नवीन टीम ही लोकांपर्यत पोहोचेल. त्यासाठी त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहनही केले आहे.

नवी दिल्ली - काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या महत्त्वाच्या बैठकीत भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.कोरोना व्हायरस या विषाणूमुळे राजधानी दिल्लीला मोठा फटका बसत आहे. त्यासाठी सर्व पक्षांची बैठक आज सकाळी ११ वाजता दिल्ली सचिवालयात होणार आहे. कोरोनाच्या विळख्यातून राजधानीला कसं बाहेर काढता येईल याविषयावर बैठकीत चर्चा होणार असून १०० खासगी रुग्णालयांवर रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्राने १० टीम तयार केल्या आहेत. 

दरम्यान दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. बुधवारी दिल्लीत १३१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. याआधी १२ नोव्हेंबर रोजी १०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या १० दिवसात कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण १.४८ टक्के राहिले आहे.श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एका टोल प्लाझाजवळ गुरुवारी पहाटे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत चार दहतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.एका चारचाकीमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बान टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही कारवाई सुरू असून, संपूर्ण परिसर लष्कराने सील केला आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर टोल प्लाझा परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबत, नागोर्ता ते उधमपूरपर्यंतची सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

यापूर्वी आठ नोव्हेंबरला श्रीनगरच्या माचिल भागात एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले होते. या कारवाईदरम्यान बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर, एक नोव्हेंबरला जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहीदीन दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ठार झाला होता. या कारवाईत एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.

मुंबई -  पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाईक करत ताब्यात घेतले. “हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची,” प्रतिक्रिया राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

मुंबई - उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजरा होणारा छटपूजेचा सण येत्या शुक्रवारी व शनिवारी (२० व २१ नोव्हेंबर) साजरा केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित संस्थांना सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या या महापालिकेच्या विभागस्तरावरुन देण्यात येणार आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार छटपूजा ही समुद्र, तलाव, नदी किनारी सूर्यास्त व सूर्योदयाच्या कालावधी दरम्यान केली जाते. सदर पूजेदरम्यान जमा होणारे निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाते. या अनुषंगाने सर्व भाविक समुद्र, तलाव, नदी किनारी जमा होतात. सद्यस्थितीत मुंबई ‘कोविड-१९’ च्या महामारीचा सामना करत असून, सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने तसेच दरवर्षी छटपूजेदरम्‍यान समुद्र किनारी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी या वर्षी छटपूजा उत्सवाच्या आयोजनाबाबत महापालिकेने उपाययोजना करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.या सणाच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जीत करण्यासाठी समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची असलेली शक्यता लक्षात घेऊन यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget