.. तर त्याचा राम नाम सत्यचा प्रवास सुरू होईल ; 'लव जिहाद'वरून योगींचा इशारा

लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'लव जिहाद' प्रकरणावरून इशारा दिला आहे. 'जर महिलांच्या सन्मानाला कोणी धक्का पोहचवत असेल, महिलांची ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा राम नाम सत्यचा प्रवास सुरू होईल', असे योगी आदित्यनाथ म्हणाले. लव जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा करणार असल्याचे सुतोवाचही मुख्यमंत्र्यांनी दिले.योगी आदित्यनाथ यांनी बोलताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. फक्त विवाहासाठी धर्मांतर स्वीकार्य नसून ते ग्राह्य धरायला नको, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्याचे योगींनी सांगितले. लव जिहादची प्रकरणे कठोरपणे हाताळणार असल्याचे ते म्हणाले.'आम्ही कठोर कायदा आणू, जे मुलींची खरी ओळख लपवून त्यांच्या आत्मसन्मानाशी खेळतात, त्यांचा अपमान करतात. त्यांना माझा इशारा आहे. जर त्यांनी हा मार्ग बदलला नाही तर त्यांचा राम नाम सत्यचा प्रवास सुरू होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.  यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या 'मिशन शक्ती' चा उल्लेख केला. महिलांची सुरक्षितेसाठी आणि सन्मानासाठी शक्ती मिशन सरकारने सुरू केले आहे. जर कोणी चुकीचे काम करत असेल तर त्याला मिशन शक्ती उत्तर देईल. न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांचा आत्मसन्मान राखला जाईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget