पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सी-प्लेन’चे उद्घाटन

केवडीया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियाजवळील स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान सी-प्लेनचे अनावरण केले.मोदींनी येथून सरदार सरोवर धरणाजवळील तलाव -३ येथून विमान प्रवास करत सेवेचे उद्घाटन केले. उद्घाटनापूर्वी मोदींनी या सेवेचा तपशील घेतला. तसेच सी-प्लेनची संपूर्ण माहिती घेतली. सी-प्लेन हे अहमदाबाद ते केवडिया हे २०० किमीचे अंतर केवळ ४० मिनिटांत पार करणार आहे. त्यामध्ये १९ जणांना बसण्याची क्षमता आहे. हे सी-प्लेन ३०० मीटरच्या धावपट्टीवर उड्डाण घेऊ शकते.

सी-प्लेनची दररोज अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर ८ उड्डाणे होणार आहेत. या सी-प्लेनमध्ये प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला ४ हजार ८०० रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. विदेशी तज्ज्ञांकडून भारतीय वैमानिकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सी-प्लेनद्वारे वाहतूक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget