चौथ्यांदा नितीश कुमार होणार मुख्यमंत्री

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे चौथ्यांना मुख्यमंत्रीपदावर विजारमान होण्यासाठी नितीश कुमार यांना संधी मिळणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवत मॅजिक फिगर गाठली आहे.भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले आहेत. १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जेडीयू आणि मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महागठबंधनने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी आरजेडी  केली आहे. तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.महागठबंधनमधील काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीएला बहुमत मिळाल्याने नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget