विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होण्याची शक्यता

मुंबई - कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा विचार सुरू आहे. याबाबत नागपूर इथली तयारी कितपत आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याची शक्यता आहे. 

नागपूरला अधिवेशन घ्यायचे ठरल्यास सगळा शासकीय लवाजमा मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नागपूरला हलवावा लागतो. कोरानाचे नियम पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची ? हा मोठा प्रश्न आहे. तर नागपूरचे आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरात होते. त्यामुळे आमदार निवासात रहायला आमदारांचाही विरोध वाढू लागला आहे.त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget