मुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती

मुंबई  - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गोटया या सारख्या कौशल्य विकास करणाऱ्या पारंपरिकखेळां पासूनही दूर होत चालली आहे, नव्हे खूप दूर गेली आहे. २५-३० वर्षांपूर्वी दिवाळित दारात रांगोळी काढताना, स्वतः कंदील बनवून दारात लावताना, किल्ला बनवताना कोण आनंद होत असे. आता रांगोळिचे तयार स्टीकर लावून, तयार कंदील लावून दीवाळी साजरी केली जाते. किल्ला करायच्या भानगडीत कोणी पडतच नाही. कारण पुरेशी जागा, माती अशा गोष्टींची वानवा. मात्र अजूनही काही मंडळींनी आवर्जून या परंपरेला टीकवून ठेवलं आहे. कोवीड साथी मुळे  काॅलेजना सुट्टी असल्याने मिळालेल्या वेळेचा सकारात्मक उपयोग करून नेहरू नगर, कुर्ला येथील संपदा हाऊ. सोसायटी मधील  हर्ष पेडणेकर, तन्मय ठाकूर, आदित्य कूंदर, वैष्णवी बिडू, प्रयाग सातपुते, हिमानी रासम, कृत्तिका धुमाळे, अथर्व धुमाळे, निशांत धोंडे, समिक्षा सिनकर, अक्षय देसाई या युवा मंडळिंनी मिळून दिवाळी निमित्ताने किल्ले बनवण्याची ही परंपरा चौथ्या वर्षीही  कायम ठेवलीय.१४x१२ फूट जागेमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची (जलदुर्गाची) आकर्षक प्रतिकृती समुद्राच्या आभासा सह तयार केली आहे. त्यासाठी सोसायटीने अमुल्य सहकार्य केले.  हे प्रदर्शन नेहरू नगर मधील नागरिकांसाठी आकर्षण ठरले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget