पोटनिवडणुकीतही भाजपाची बाजी

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकी बरोबरच देशातल्या ११ राज्यांत जवळपास ५४ जागांसाठी पोटनिवडणूक झाल्या होत्या. या निवडणुकांतही भाजपाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशात भाजपाने मुसंडी मारत सत्ता राखण्यात यश मिळवले आहेत. तर गुजरातमधील ८ ही जागा भाजपाने जिंकल्या.

मध्य प्रदेशात सत्ता राखण्यात यश -मध्य प्रदेशातील २८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पैकी १९ जागांवर भाजपाने विजय नोंदवला आहे. तर काँग्रेसला ९ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदीयांच्या बंडानंतर काँग्रेसच्या जवळपास २६ आमदारांनी राजिनामा दिला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कमलनाथ जावून शिवराजसिंह यांची सत्ता आली. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपा आणि काँग्रेससाठी महत्वाची होती. त्यात भाजपाने बाजी मारत सत्ता कायम राखली आहे.कर्नाटकच्या २ जागाही भाजपाने जिंकल्या आहेत. तर मणिपुरच्या ५ जागां पैकी ४ जागांवर भाजपाने जिंकल्या आहेत. तर १ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांनी राजिनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या होत्या. तर तेलंगाणामध्ये टीआरएसच्या आमदाराचा मृत्यू झाल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget