बोगस खताच्या कारखान्यावर छापा; खताचा साठा जप्त

सांगली - सांगलीच्या म्हैसाळ येथे एका बोगस रासायनिक खताच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल १८ लाख ७५ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा कृषी विभागाने ही कारवाई केेली आहे.सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ या ठिकाणी एक सुरू असलेल्या एका बोगस रासायनिक खत निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने ही कारवाई केली. पलूस तालुक्यातील सरिता कृषी केंद्राच्या तपासणी दरम्यान कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाला आक्षेपार्ह खतसाठा आढळून आला. त्यामध्ये तुषार प्रोडक्ट या कंपनीचे नियमबाह्य खत असल्याचे समोर आले.कृषी विभागाच्या पथकाने मिरज तालुक्यातील तुषार प्रोडक्ट कारखान्यावर छापा टाकला. यावेळी अनेक रासायनिक खतांच्या निर्मितीचे याठिकाणी उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आले. ही सर्व खते नियमबाह्य पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येत होती. कृषी विभागाच्या पथकाने या ठिकाणी असणारा वेगवेगळ्या घटकांचे १८ लाख ७७ हजार रुपये किमतीचे खतांचे साठे जप्त केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget