प्रेमात पडला प्रभुदेवा; विवाह बंधनात अडकणार?

मुंबई - अभिनेता, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळख असणारा, दाक्षिणात्य कलाविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणारा प्रभुदेवा लवकरच त्याच्या आयुष्यात नवे वळण येणार असल्याचे म्हटले जात आहे. हे वळण म्हणजे विवाहबंधनात अडकण्याचे.प्रभुदेवा पुन्हा एकदा प्रेमात असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर येत्या काळात तो या प्रेमाच्या नात्याला एक नवे नाव देत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेणार असल्याचेही म्हटले जात आहे. प्रभुदेवा हा त्याच्या भाचीसोबतच रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. नव्याने प्रेमाच्या नात्याची अनुभूती घेणारा हा सेलिब्रिटी नात्याला पुढच्या टप्प्यावर नेत तिच्याशी लग्न करणार असल्याचे कळत आहे. दरम्यान, अद्यापही याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रभुदेवाची नवी इनिंग नेमकी कशी असेल याबाबतची कमालीची उत्सुकता आणु कुतूहल पाहायला मिळत आहे. प्रभुदेवानं २०११ मध्ये पत्नी रामलता हिला घटस्फोट दिला होता. यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यासोबतच्या त्याच्या नात्याबाबतच्या अनेक चर्चांनी जोर धरला होता. आता यामध्येच सर्व चर्चा दूर सारत भाचीशी तो खरेच विवाहबंधनात अडकणार का हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.  

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget