मौल्यवान धातूची चोरी करणाऱ्याच्या १२ तासात मुसक्या आवळल्या

ठाणे - भिवंडीतील एका कंपनीत मौलवान धातूवर प्रक्रिया करून जर्मन, जपान, अमेरिका अशा देशात पाठवण्यात येणाऱ्या सव्वाकोटी रुपयांच्या मौलवान धातूची चोरी झाली होती. ही घटना ८ नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी नारपोली ठाण्यात १२ नोव्हेंबरला तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोहनसिंग राजपूत, तारासिंह भैरवसिंह परमार, हिरासिंह भैरवसिंह परमार असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भिवंडी परिमंडळचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी माहिती दिली.

भिवंडी तालुक्यात गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर घरफोडीच्या घटना घडत असतात. यातच वळगाव येथील माँ पद्मावती कॉम्प्लेक्समधील नोंनफेरस मेटल या कंपनीच्या गोदामातून ८ नोव्हेंबरच्या रात्री शटरचे लॉक तोडून टंगस्टन कार्बाईड या नावाचे मौल्यवान धातूची चोरी झाली होती. ही बाब मालक निखिल नरेंद्र दुबल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबरला तक्रार दाखल केली. यानुसार पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे आणि पथकाने तपास सुरू केला. यात गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मोबाईलचा तांत्रिक तपास करीत अवघ्या १२ तासांत राहनाळ गावातून सोहनसिंग राजपूतला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोहनसिंग राजपूत हा कंपनीच्याच गोदामात काम करणारा कामगार आहे. याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच भंगारखरेदी करणाऱ्या सख्या भावाशी संगनमत करून गोदामातील मौलवान धातू लंपास केल्याची कबुली दिली.चोरीतील मुख्य आरोपी सोहनसिंग राजपूत याला ताब्यात घेतल्यानंतर काही तासातच त्याचे भंगार व्यावसायिक साथीदार तारासिंह भैरवसिंह परमार, हिरासिंह भैरवसिंह परमार या दोघा भावांनाही राहनाळ गावातूनच ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एक कोटी, ३५ लाख, एक हजार ९१२ रुपयांचा १२.३ टन वजनाचा मौल्यवान धातू हस्तगत करण्यात आले. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget