कोव्हिड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग

मुंबई - मुंबईतल्या एका कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या कुरार परिसरात असणाऱ्या पठाणवाडी जंक्शनजवळ डीएनए या खाजगी हॉस्पिटलमधल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सुरक्षारक्षकाकडून विवाहितेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कोचेवाड (२१) असे विनयभंग केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. सुरेशवर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ज्याची सुरक्षारक्षक म्हणून निवड करण्यात आली त्याने विनयभंग केल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर महिला कुठल्याच क्षेत्रात सुरक्षित नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये जर रुग्णालयात असे प्रकार घडत असतील तर महिलेच्या सुरक्षेचं काय असा सवाल यातून उपस्थित होतो.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget