हिवाळी अधिवेशन मुंबईतच ; ७ डिसेंबरपासून सुरुवात

मुंबई -  हिवाळी अधिवेशन हे मुंबईत होणार असून, ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विधिमंडळ कामकाज समिती बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरला घेण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत. या बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईतहिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्या राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ७ डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का? आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget