उत्तर प्रदेशमध्ये चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या

लखनऊ - उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसंदर्भात कडक नियम करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बलात्काराच्या घटना थांबल्यानसून उतर प्रदेशातील भीषण वास्तव समोर येत आहे.पुन्हा राज्यातील पीलीभीतमध्ये शनिवारी सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. आरोपीने बलात्कारानंतर गळा आवळून तिची हत्याही केली.६ नोव्हेंबरला सायंकाळी माधो तांडा पोलीस स्टेशन परिसरातून चिमुरडी गायब झाली होती. शोधाशोध केल्यानंतरही तिचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी मुलीचा मृतदेह परिसरातील उसाच्या शेतात आढळला. पीडित मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अशी माहिती पोलिस जयप्रकाश यादव यांनी दिली.दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. संबधित युवकाला घटनास्थळी पाहण्यात आले होते. तर माजी राज्यमंत्री हेमराज वर्मा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. जोपर्यंत आम्हाला मदत केली जात नाही. तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमीका कुटुंबीयांनी घेतली आहे.रंतु पोलिसांना जबरदस्तीने मृतदेह अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होती. राज्यात नक्कीच जंगलराज आहे.उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. या घटनेचा संपूर्ण देशभर निषेध करण्यात आला होता. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. १४ सप्टेंबरला या तरुणीवर अत्याचार झाले होते. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget