मीरा भाईंदरमधील विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-भूमिपूजन

मीरा भाईंदर  - ८ नोव्हेंबर रोजी मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या कामासह विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने दुपारी १२.३० वाजता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. बहुप्रतिक्षित असलेले मीरा भाईंदर येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे भूमिपूजन होणार असल्याने या भव्य प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. यावेळी सर्व आमदार नगरसेवक,प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे भूमिपूजन यावेळी केले जाणार आहे. त्याचवेळी भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानावर तयार झालेल्या 'कोविड सेंटर'चे लोकार्पण देखील होणार आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरासाठी 'कोविड टेस्टिंग लॅब'चेही उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. हे भुमिपूजन-लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. काशीमीरा प्रभाग क्रमांक १४ येथे BSUP योजना अनेक वर्षांपासून निधी अभावी रखडून पडली आहे. त्याला राज्य शासनाने दिलेल्या अर्थसहाय्यामुळे नव्याने बांधकाम सुरु होत आहे. त्या कामाचा शुभारंभही याचवेळी होणार आहे.यावेळी राज्याचे नगरविकास व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,खासदार राजन विचारे, मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्सना हसनाळे,आमदार प्रताप सरनाईक,आमदार रवींद्र फाटक,आमदार निरंजन डावखरे,आमदार गीता जैन,आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्यासह विविध मान्यवर व मीरा भाईंदर पालिकेतील सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget