राष्ट्रवादी महिला पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात

बदलापूर - बदलापुरमध्ये राष्ट्रवादी काँंग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांची घरवापसी झाली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती.  तातडीने शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्याशी संपर्क साधत घरवापसीची वेळ निश्चित केली. देशमुख यांच्या कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास कविता पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला.वरिष्ठांच्या नाराजीनंतर शहर कार्याध्यक्षा कविता पाटील यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश दिला होता असे सांगितले जात होते. मात्र,  याबाबत कविता पाटील यांना विचारले असता, माझा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाचा कार्यकाळ संपलेला होता. प्रवेशावेळी मी कोणत्याही पदावर नव्हते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  शिवसेनेचे शहरप्रमुख वाहन म्हात्रे यांनी सांगितले की,भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश शिवसेनेत होणार होता. त्याच वेळी कविता पाटील यांचाही प्रवेश झाला. मात्र त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत याची माहिती नव्हती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याचे कळताच त्यांना पुन्हा त्यांच्या पक्षात पाठवण्यात आले आहे, असे सांगितले.

दरम्यान गेल्याच आठवड्यात उल्हासनगर शहरात झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीत शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळत  सभागृह नेते आणि एक प्रभाग समिती सभापती पद अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँंग्रेसला देऊ  केले होते. त्यामुळे शिवसेनेची उल्हासनगरात एक आणि बदलापुरात दुसरी भूमिका कशी, असा प्रश्न बदलापुरातून उपस्थित करण्यात येत होता. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget