बिहारच्या मंत्रिमंडळाचे नितीश कुमार यांनी केले खातेवाटप

पाटणा - नितीश कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना विविध विभागांचे वाटप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने नितीश कुमार यांच्याकडे गृह विभागाची मागणी केली आहे. असे असले तरी नितीश कुमार यांनी अद्याप गृह विभाग स्वत:कडेच ठेवले आहे.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. २३ नोव्हेंबरपासून पाच दिवसीय अधिवेशन घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन, निवडणूक दक्षता आणि इतर वाटप न केलेल्या विभागांची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे. उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ, पर्यावरण आणि वन, व्यापारी कर, आपत्कालीन नियोजन आणि शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यंत्री रेणू देवी यांच्याकडे पंचायत राज, मागास विकास आणि ईबीसी कल्याण आणि उद्योग मंत्रालय देण्यात आली आहे.विजय चौधरी यांच्याकडे ग्राम विकास विभाग, जलसंपदा, माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कार्य मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. विजेंद्र यादव यांच्याकडे उर्जा, योजना, अन्न आणि ग्राहक मंत्रालयाची जबाबदारी आहे. तर मेवा लाल चौधरी यांच्याकडे शिक्षण मंत्रालय देण्यात आले आहे.

नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात सोमवारी पार पडला. यावेळी राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत नियमांचे पालन करण्यात आले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget