शेठजीच्या पक्षाचे फालतू लोक अन्वय नाईक तपासाची दिशा भरकटवत आहेत ; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई - अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप किरीट सोमय्या महोदयांनी मारली आहे. एक मराठी भगीनी यांचे कुंकू पुसले. ती न्यायासाठी आक्रोश करत आहे. अबलेला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेठजीच्या पक्षाचे फालतू लोक तपासाची दिशा भरकवटण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. कुठेही जा, तपास होणारच असे सांगत ही त्यांना वॉर्निंग आहे, अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

 शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते, बनावट लोक अन्वय नाईक आत्महत्याबाबत बोलत नाहीत.मराठी भगिनीच कुंकू पुसले गेले त्याबाबत बोलत नाहीत, आरोप खोटे आहेत.कोणत्या जमिनीचे व्यवहार ? कोण आहे हा माणूस, व्यवहार दाखवावेत, हा त्यांना इशारा आहे. मराठी माणसाने व्यवहार केलेला खूपत आहेत का ? कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार केलेला आहे. त्यांना कितीही फडफडू देत, हे वैफल्य आहे. एका आरोपीला भेटायला अलिबागला जात आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांवर केला आहे.

ईडी काही तुमच्या बापाची आहे का? असेल तर तुम्हाला २५ वर्ष घरी बसवू. किरीर सोमया हा गिधाडसारखा पेपर घेऊन फडफडतोय. ही त्यांना वॉर्निंग आहे. तुम्ही कितीही काहीही करा पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. कितीही फडफड करु द्या, त्यांनी काहीही निष्पन्न होणार नाही. रोज सकळी ते स्वतःची प्रतिमा आरश्यात पाहतात, आणि मग भ्रष्टाचार त्यांना वाटतो. बनावट लोक आहेत, व्यापारी आहे ढोंगी खोटे आरोप करताय. व्यापाऱ्यांना, दलालांना आम्ही घरी बसवले. इडी यांच्या बापाची आहे का? असे असेल तर त्यांनी सांगायला हवे, हे सगळे बडबडणारे इडीचे दलाल आहेत, त्यांना आम्ही २५ वर्ष घरी बसवू, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा वर्मी घाव बसल्यामुळेच विरोधक बिथरले आहेत. त्याच निराशेतून असे आरोप होत असल्याचा पलटवार शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पलटवार केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे मिळून २१ सातबारे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी का केली, असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे. .

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget