अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सातपैकी सहा संपत्तींचा लिलाव झाला

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या सहा संपत्तींचा लिलाव पूर्ण झाला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सातपैकी सहा स्थावर मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ही लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आली असून सातव्या संपत्तीसाठी लिलावात बोली लागली नाही. याबरोबरच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक असलेल्या मृत इकबाल मिरची याच्या नावावर असलेल्या संपत्तीला सुद्धा यावेळेस बोली लावण्यात आलेली नाही.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी येथील असलेल्या वडिलोपार्जित बंगल्याचा लिलाव पूर्ण झाला आहे. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव या व्यक्तीने हा बंगला ११ लाख २१ हजार रुपयांची बोली लावून विकत घेतला आहे. दाऊदच्या या सहा मालमत्तांपैकी चार भूपेंद्र भारद्वाज या बोली धारकाने जिंकल्या असून उर्वरित दोन संपत्ती दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी जिंकल्या आहेत. यांचा लिलाव मुंबई १० नोव्हेंबरला पूर्ण झाला. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget