तुरूंगातून बाहेर येताच अर्णब गोस्वामींचे शक्ती प्रदर्शन ; उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

मुंबई -  अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. न्यायालयाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी कारागृहातून बाहेर येताच त्यांनी आपले शक्तीप्रदर्शन दाखवले आहे. 'मी सुप्रीम कोर्टचा आभारी आहे. हा भारताच्या जनतेचा विजय आहे.' असे म्हणत त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या.नंतर न्यूज रूममध्ये पोहोचले, यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे, असेही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. तसेच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचे ते म्हणाले. मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले. 

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याचेही म्हटले. सरकारने राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्णय केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget