कांजूरच्या कारशेडची जागा राज्य सरकारचीच पर्यावरण प्रेमींचा दावा


मुंबई -
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ च्या कारशेडच्या कांजूरच्या जागेवरून नवा वाद पेटला आहे. ही जागा कारशेडसाठी दिल्यानंतर, कारशेडचे काम सुरू झाले. मात्र केंद्र सरकारने अचानक या जागेवर आपला मालकी हक्क असल्याचा दावा करत काम बंद करण्याची नोटीस राज्य सरकारला बजावली आहे. त्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे कांजूरची जागा नक्की कुणाची?

केंद्राने कांजूरच्या जागेवर मालकी हक्क दाखवला असला तरी राज्य सरकार सात बारा आपल्या नावावर असल्याचे सांगत आहे. दरम्यान, या वादात आरे कारशेड विरोधातील याचिककर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी उडी घेतली आहे. ही जागा राज्य सरकारचीच असून त्यावर कोणताही न्यायालयीन वाद नाही. हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महसुल मंत्र्यांनी न्यायालयात स्पष्ट केल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे. मेट्रो ३ चे कारशेड आरेतील ३३ एकर जागेवर होणार होते. पण याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. सेव्ह आरेच्या माध्यमातून रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू केली. ही लढाई मागील ६ वर्षे सुरू होती. पण अखेर सत्ता बदलली आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुकी आधी दिलेला शब्द पाळला. आरेतील कारशेड रद्द केले. तर आता कांजूर मार्ग येथील जागेवर मेट्रो ३ चे कारशेड होणार आहे. मुळात ही जागा आधीच राज्य सरकारने मेट्रो ६ साठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ला दिली आहे. तर याच जागेवर आता मेट्रो ६ सह मेट्रो ३ चेही कारशेड होणार आहे.मेट्रो ३ चे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून करण्यात येत आहे. मात्र, मुळात २०१४ पासून फडणवीस सरकार आरेतच कारशेड बांधण्यास ठाम होते. त्यावेळी सत्ता असल्याने फडणवीसांनी सर्व विरोध डावलून आरेत काम सुरू केले. त्यावेळी अनेक पर्यावरण प्रेमींनी आंदोलने केली.कांजूरच्या जागेवर मेट्रो ६ चे कारशेड बांधण्यास २०१८ मध्ये मंजुरी दिली गेली. पण याच जागेवर मेट्रो ३ चे कारशेड बांधण्यास मात्र विरोध होत आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता केंद्र सरकारने कांजूरची जागा आपली असल्याची नोटीस बजावत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget