मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई - मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उत्तर मुंबईतल्या मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर इथल्या बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देत त्यांचे त्वरित स्थलांतर करायचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी दिले. मिठी नदी भागातल्या विमानतळ प्राधिकरण जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत, वर्षावर बैठक झाली. त्यावेळी हे निर्देश दिले.या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

१९९५ च्या कायद्यानुसार अपात्र झोपडपट्टीधारकांना २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तर झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती देण्यात यावी, असे ते म्हणाले.कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेमध्ये असून या ठिकाणी १७ हजार २०० घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीस किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच मिठी नदी पात्रात काही घरे आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget