खासदार नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन

अमरावती - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आमदार रवी राणा यांना अटक करून शुक्रवारी रात्री डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय या कोविड कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावर खासदार नवनीत राणा कार्यकर्त्यांसह आमदार राणा यांना भेटायला कारागृहात पोहचल्या. त्यांना कारागृहात आमदार राणा यांच्याशी भेटण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी कारागृहासमोरच धरणे आंदोलन सुरू केले.

 मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. आंदोलन हिंसक मार्गावर जाण्याची लक्षणे दिसताच पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह १०० जणांना अटक केली. या सगळ्यांची शुक्रवारी रात्री कारागृहात रवानगी करण्यात आली.खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना भेटायला कारागृह परिसरात आल्या. तेव्हा कारागृह परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. खासदार नवनीत राणा यांना कारागृहापासून काही अंतरावर रोखण्यात आल्याने प्रकरण चिघळले. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.दिवाळी सणासुदीचे दिवस आहेत, यामुळे शहरात शांतता राहावी यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड थांबवा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस प्रशासनाकडे केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केल्याने आणि आमदार रवी राणा यांनी कारागृहातून बाहेर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधल्यावर खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन आटोपते घेतले.विदर्भातील शेतकऱ्यांचे दुःख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळायला हवे, यासाठी मी मुंबईला जाणार असून सोमवारी मातोश्रीसमोर आंदोलन करणार, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget