कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई - ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौत विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अभिनेता हृतिक रोशन याच्याविरोधात काहीही न बोलून मौन बाळगण्याच्या अख्तर यांच्या भूमिकेवर कंगना मागील काही काळापासून सातत्याने निशाणा साधत होती. 

एका मुलाखतीत ती अख्तर यांच्याविषयी म्हणाली होती, 'एकदा जावेद अख्तर यानी मला घरी बोलावले होते. राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय हे सारे मोठे व्यक्ती आहेत असे ते म्हणाले होते. तू त्यांची मदत घेतली नाहीस तर तुझ्याकडे आणखी कोणताच पर्याय नसेल. ते तुला कारागृहात टाकतील. तुला आत्महत्या करावी लागेल'. हे खुद्द जावेद अख्तर यांचेच शब्द असल्याचे ती बोलली होती. हृतिकची माफी मागण्यावाचून आपल्याकडे कोणताही पर्याय नसल्याचे सांगताना ते आपल्यावर प्रचंड ओरडले होते असा गौप्यस्फोटही तिने केला होता.अख्तर यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांचा तिने कित्येकदा पुनरुच्चार केला आहे. किबंहुना तिच्या बहिणीनेही त्यांच्यावर टीका कोली होती. 



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget