तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू

तुळजापूर - तुळजाभवानी मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार तुळजाभवानी मंदिराच्या ३०० मीटर परिसरात कुणालाही प्रवेश करता येणार नाही. दुसरीकडे राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी तुळजाभवानी मंदिर परिसरात कालपासून भाजपच्या आध्यात्मिक आघाडचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र, काल रात्री प्रशासनाकडून आंदोलन स्थळावरील तंबू काढून टाकण्यात आला. तसेच तुषार भोसले यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेले आहे. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र लिहून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्र्यांना साधू-संतांशी बोलायला वेळ नाही, अशी टिका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केली आहे. राज्यभरातील साधू-महंतांच्या उपस्थितीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारावर देवीची आरती केली. त्यानंतर राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

भाजप आध्यात्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनाने रातोरात उखडून टाकला आहे.'दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget