केंद्र सरकार विरोधात चैत्यभूमीवर काँग्रेसचे आंदोलन

मुंबई - देशात ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे, त्या ठिकाणी मागील काही वर्षांत दलित, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार वाढले आहेत. हे अत्याचार रोखण्याऐवजी भाजपाकडून त्यांना पाठबळ दिले जात असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या विरोधात काँग्रेसकडून आज (बुधवार) सकाळी १० वाजता दादर येथील चैत्यभूमीवर केंद्र सरकार आणि भाजपाविरेाधात निदर्शने केली जाणार आहेत.

काँग्रेसकडून बुधवारी महिला व दलित अत्याचार विरोधी दिवस पाळला जाणार असून चैत्यभूमीवर होणारे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आदी मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित वाल्मिकी कुटुंबावर झालेला अन्याय अत्याचार देशाने पाहिला आहेत. या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरू आहे. उत्तर प्रदेशसह देशातील भाजपशासित राज्य सरकारे तसेच नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात महिला व दलित समाजावर अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात भाजपा सरकारे अपयशी ठरली आहेत. गुन्हेगारांना शासन देण्याऐवजी या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम भाजप सरकारकडून होत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडित कुटुंबांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget