तेजस्वी यांची ताकद वाढली ; बिहारमध्ये आरजेडी सर्वात मोठा पक्ष

पाटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचे सरकार येत आहे. मात्र, तेजस्वी यादव कदाचित सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले असतील पण लोकांनी त्यांना पूर्णपणे नाकारलेले नाही. त्यांचा जरी पराभव झाला तरी त्यांची वाढलेली ताकद बरेच काही सांगू जात आहे. भविष्यात पक्षाला चांगले दिवस असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी जेडीयूला एक प्रकारे इशारा मिळाला आहे. त्यामुळे बिहारचे आगामी राजकारण वेगळे असलण्याची चिन्हे आहेत.

तेजस्वी यादव यांच्या पक्ष  बिहारमध्ये १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या. बिहारमधील आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या राजकीय पक्षाला २३ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेजस्वी यादव यांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट ५२.१ टक्के होता. निवडणुकीत तेजस्वीची लढाई हा शानदार विजय होता, असे आकडेवारी सांगते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या जाहीर प्रचार मेळाव्यात दिसून आले. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये रेकॉर्ड करत २५१ प्रचार सभा घेतल्या. ते फक्त राजदच नव्हे तर महागठबंधनचा सर्वात मोठा चेहरा बनला. त्यां

२०२० च्या निवडणुकीत तेजस्वीची शैली वेगळी दिसत होती. निवडणुकीच्या मुद्यावर तेजस्वी आक्रमक दिसून आले. तसेच निवडणुकीत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते आपल्या मुद्द्यांवर भरकटलेले नाही तर ते आपल्याच मुद्द्यांवर शेवटपर्यंत ठाम राहिले. तेजस्वी यांनी बिहारमधील बेरोजगारीला मोठा मुद्दा बनविला. त्यांनी तरुणांना आश्वासन दिले की जर त्यांचे सरकार बनले तर १० लाख नोकऱ्या देऊ.तेजस्वी यादव यांनी निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर विरोधक भर देतील, हे हेरले होते. जंगल राज आणि यादव कुटुंब या मुद्द्यांवर एनडीए हल्ला करेल, हे तेजस्वी यांना ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी अशा निवडणुकीची रणनीती तयार केली जेणेकरून या मुद्द्यांवर विरोधकांना बोलता येऊ शकत नाही. लालू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा होऊ नये तसेच लालू यादव आणि राबडीदेवी यांच्यामाध्यमातून टीका होऊ नये, म्हणून त्यांनी निवडणूक पोस्टर्समध्ये त्यांना स्थान दिले नव्हते. एवढेच नाही तर तेजस्वी यांच्या भाषणाची शैली आणि लोकांशी संवाद साधण्याची पद्धतही लोकांना आवडली होती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget