आज बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता नवीन सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज बिहारमध्ये एनडीएच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे.दुपारी साडेबारा वाजता बैठक..मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बैठक सुरू होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित राहणार आहेत. बैठक पर्यवेक्षक म्हणून ते काम पाहतील. तसेच, भाजपच्या आमदारांचीही आज बैठक पार पडणार आहे. दरम्यान भाजपच्या प्रदेश मुख्यालयात ही बैठक पार पडणार आहे.या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासोबत, भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडवणीस आणि बिहार राज्य प्रभारी भूपेंद्र यादव हे दोघेही उपस्थित असणार आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget