अर्णब गोस्वामींविरोधात आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई - रिपब्लीक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना रायगड पोलिसांनी अटक केली होती. अलिबाग कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यासंदर्भात आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा. तसेच तत्काळ  जामीन मिळावा यासाठी अर्णब यांनी हायकोर्टात धाव घेतली. 

दरम्यान आज केवळ अंतिरम जामिनावरच सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट  केले आहे. तर दुसरीकडे अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी रायगड पोलिसांकडून पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही सुनावण्यांकडे सर्वाचेच लक्ष असणार आहे.अर्णब गोस्वामी हे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी सध्या तुरूंगात आहेत, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget