एनसीबीकडून चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या पत्नीला अटक

मुंबई - चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला रविवारी अटक करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, ड्रग्ज संबंधित प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.एनसीबी लवकरच निर्मात्यास समन्स पाठवण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, एनसीबी फिरोजच्या घरी पोहोचली त्यावेळी तो घरी नव्हता.७-८ नोव्हेंबरच्या मध्य रात्रीपासून, एनसीबी अनेक ड्रग पेडलर्सच्या घरी छापा टाकत होती. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत ५ ड्रग पेडलरना ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या संशयितांच्या चौकशीदरम्यान निर्मात्याचे नाव समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी एनसीबीने नवी मुंबई आणि मुंबईच्या विविध भागात छापा टाकला. तेथून एजन्सीकडून गांजा आणि एमडी व्यावसायिक प्रमाणात सापडला. या छाप्यात एनसीबीने चार जणांना अटकही केली होती, ज्यांची चौकशी सुरू आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने शनिवारी मुंबईतील ५ ठिकाणी छापा टाकला. रेड डॉग पॅडलर्स आणि सप्लायरच्या छापावर हे केले गेले. जवळपास ४ ते ५ ड्रग्स पुरवठा करणाऱ्याना ताब्यात घेण्यात आले आहे. या त्याचबरोबर रोकड जप्त केली आहे. तसेच त्यांची वाहनेही जप्त केली आहेत.एनसीबी लवकरच फिरोज नाडियाडवाला यांना समन्स देईल आणि त्यानंतर लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget