नालासोपाऱ्यात कोकेन सहित चार नायजेरिअन नागरिकांना अटक

नालासोपारा - बॉलिवूडसह मुंबईमध्ये गाजलेल्या 'ड्रग्ज कनेक्शन'नंतर नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांना प्रगती नगर परिसरातून अटक केली आहे. प्रगती नगर हा नायजेरियन नागरिकांचा हॉटस्पॉट असून त्यांचे अवैध धंदे पुन्हा सक्रिय झाले आहेत.नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्तदोन पथकांनी केली कारवाईप्रगती नगर परिसरात नायजेरियन व्यक्ती कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस पाटील यांना मिळाली होती. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहाय्यक फौजदार बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, शेखर पवार, सुखराम गडाख यांच्या दोन पथके तयार करून प्रगती नगर परिसरात सापळा रचला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पोलीस नजर ठेवून असताना दुपारच्या सुमारास सद्गुरु अपार्टमेंटजवळ चार नायजेरियन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी चारही नायजेरियन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दीड कोटींचे साडेसातशे ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आगू ओसीता (२८), उर्जी फिलिप्स (३०), ओगोना चुकवेनेने (२९) आणि ख्रिस अजाह चुकवेनेका (३०) असे पकडलेल्या चार नायजेरियन आरोपींची नावे आहे. तुळींज पोलीस ठाण्यात चारही आरोपी विरोधात एनडीपीएसप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget