न्यूड फोटोशूट प्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल

मुंबई - अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ नोव्हेंबरला मिलिंद सोमणने वाढदिवसानिमित्त समुद्रावर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. गोव्याच्या समुद्र किनारी हा फोटो काढला होता.. त्यामुळे त्याच्यावर अश्लील कृत्य आणि गाणी तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अश्लील सामग्री प्रकाशित करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.फिटनेसबद्दल मिलिंद सोमण कायमच सगळ्यांना प्रेरणा देत असतो. यावेळी त्याने एक पाऊल पुढे होऊन समुद्र किनारी धावणारा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत तो नग्न अवस्थेत धावत आहे.. त्याचा हा फोटो त्याची पत्नी अंकिता कोनवरने क्लिक केला आहे. पण हाच फोटो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

दरम्यान, पूनम पांडे ही सप्टेंबर महिन्यात गोव्यात गेली होती. तिथे तिने धरणावर फोटो शूट केले होते. या वादग्रस्त फोटो शूट प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रिकरण केल्याने  मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.पूनम पांडेला 'त्या' व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. या प्रकरणी पूनम पांडेला २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.  पूनम पांडे आणि तिच्या नवऱ्याला सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget