मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत 'घोडेबाजार' ; ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर गंभीर आरोप

भोपाळ - मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत ‘घोडेबाजारा’चा आरोप भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर करण्यात आला आहे. कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहिलेले काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी सिंधिया यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी शिंदे यांनी आपल्याला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचे सिंघार म्हणाले. काँग्रेस नेत्याच्या आरोपानंतर मध्य प्रदेशात आता राजकारण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी सिंधिया यांच्याकडे आरोपांबाबत उत्तर मागितलं आहे.

बदनावरमधील प्रचारसभेदरम्यान दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना आव्हान दिले आहे. ‘उमंग सिंघार हे ज्योतिरादित्य यांचे खास होते. आता त्यांनी जे आरोप केले आहेत, त्यावर सिंधिया यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. उमंग सिंघार खरे बोलत आहेत की खोटे ? हे सिंधिया यांनी सांगायला हवे.’ असे आव्हान दिग्विजय यांनी केले आहे.दिग्विजय सिंग यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘शिवराजसिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकायला हवे. एका मतासाठी त्यांचे सरकार पडले होते. ते सिद्धांतवादी होते.’ असा टोला दिग्विजय यांनी लगावला आहे.

काँग्रेसमध्ये तुम्हाला भविष्य नाही, तुम्ही भाजपमध्ये व्हा, तुम्हाला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपद देतो, असं ज्योतिरादित्य सिंधिया आपल्याला म्हणाले होते’, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री उमंग सिंघार यांनी केला आहे. त्यावेळी मी सिंधिया यांना सांगितले होते, की माझ्यासाठी सिद्धांत महत्वपूर्ण आहेत, पद नाही, असे उत्तर आपण सिंधिया यांना दिल्याचे सिंघार म्हणाले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget