रुग्णालयाच्या शौचालयात मृतदेह सापडला, वैद्यकीय अधीक्षक निलंबित

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयाच्या शौचालयात एक मृतदेह तब्बल १२ दिवस पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू असताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १३ परिचारकांवरही प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रूग्णालयात १८ ऑक्टोबर रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रूग्णालयात बनवण्यात आलेल्या कोविड वॉर्डमधील शौचालयात मृतदेह आढळून आला आहे. कोविड वॉर्डमध्ये दुर्गंधी सुटल्याने कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाहिला त्यावेळी तो कुजलेल्या अवस्थेत होता शिवाय मृतदेहात किडे पडले होते. रूग्णालय प्रशासनाने या प्रकाराची माहिती रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याला दिली असता पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रूग्णालयात पाठवण्यात आला होता. हा मृतदेह ४० वयोगटातील पुरुषाचा असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

क्षयरोग रूग्णालयाच्या कोविड वॉर्डसाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीच्या शौचालयात हा प्रकार घडल्याचे रूग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. ललित कुमार आनंदे यांनी सांगितले. हा कोविड वॉर्ड असल्याने तेथे इतर कुणाचेही जाणे-येणे नव्हते. त्यामुळे हा मृतदेह नेमका कुणाचा होता हे कळू शकलेले नाही, असेही आनंदे यांनी सांगितले. कोविड वॉर्ड तसेच क्षयरोग रूग्णालयातील रूग्णांपैकी कुणीही रूग्ण बेपत्ता नसल्याची माहिती त्यांनी दिली. रूग्णालयातील रूग्णांपैकी हा मृतहेद नाही. 'हॅपी हायपॉक्सीया'मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. घडलेल्या प्रकाराबाबत अंतर्गत चौकशी सुरू असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती क्षयरोग रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे यांनी दिली.

क्षयरोग रूग्णालयात कोविड वॉर्ड असल्याने तेथे केवळ रूग्ण आणि ठराविक कर्मचारी जात होते. मग हा अज्ञात मृतदेह आला कुठून? शौचालयात सुमारे १२ दिवस पडून राहिलेला मृतदेह कुणाच्याही लक्षात कसा आला नाही? हा मृतदेह रूग्णालयात दाखल असलेल्या कोणत्याही रूग्णाचा नाही तर मग हा मृतदेह येथे आला कसा? इतर व्यक्तींना या परिसरात बंदी असताना मृत व्यक्ती इथे कशी पोहोचली? ही हत्या तर नाही ना? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून त्याचा तपास केला जात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget