तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, तर पुन्हा जंगलराज आले असते - उमा भारती

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून एनडीएला बहूमत मिळाले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एकहाती प्रचार करत, एनडीएसमोर मोठे आव्हान निर्माण केले. तेजस्वी यादव यांच्या यशावर भाजप नेत्या उमा भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी उत्तम नेता आहेत. मात्र, सत्ता चालवण्यासाठी त्यांनी आणखी परिपक्व होण्याची गरज आहे. तेजस्वी बिहार चालवू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार आहे, असे उमा भारती यांनी म्हटले. याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्यावर निशाणा साधला. जर तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते. तर सत्ता लालूनींच चालवली असती आणि राज्यात पुन्हा जंगलराज आले असते, अशी टीका त्यांनी केली.

तेजस्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या घरात वाद-विवाद झाला असता. अशात ते बिहारचा विकास करू शकले नसते. सत्ता चालवण्यासाठी त्यांनी आणखी परिपक्व होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. कमलनाथ यांनी चांगल्या प्रकारे निवडणूक लढवली. जर त्यांनी याच प्रकारे सरकार चालवले असते तर अडचणी आल्या नसत्या. ते एक सभ्य व्यक्ती असून मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी चतुराईने ही निवडणूक लढवली, असे उमा भारती म्हणाल्या.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget