तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचे कोरोनामुळे निधन

चेन्नई - तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचे कोरोना या धोकादायक विषाणूमुळे शनिवारी रात्री निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.दोराइकन्नू १३ ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.१५ मिनिटांनी कृषीमंत्री आर. दोराइकन्नू यांनी अखेरचा श्वास घेतला.दोराइकन्नू यांना १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यानंतर त्यांच्या उपचारास सुरूवात झाली. अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी देखील दोराइकन्नू यांच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले,आर दोराइकन्नू हे त्यांच्या साधेपणा, नम्रता, शासन कौशल्य आणि शेतकरी समुदायाच्या हितासाठी कायम प्रयत्नशिल होते.कृषिमंत्री आर दोराइकन्नू तंजावूर जिल्ह्याच्या पापनासम विधानसभा मतदार संघातून २००६, २०११ आणि २०१६ मध्ये निवडूण आले होते. २०१६ मध्ये दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget